Katrina Kaif Pregnancy Post : बॉलीवूड कलाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल. काही दिवसांपासून दोघांबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू होत्या आणि चर्चेचं मुख्य कारण म्हणजे – कतरिना गरोदर आहे. सोशल मीडियावर कतरिना आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच आता स्वत: कतरिनानंच चाहत्यांना आई होणार असल्याची गुड न्यूज दिली आहे. कतरिना आणि विकी कौशल यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे दोघांचा एक क्युट फोटो शेअर करीत आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीनं ही बातमी देताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये कतरिनाच्या पोटावर विकीने हात ठेवल्याचा एक फोटो पाहायला मिळत आहे आणि हाच फोटो दोघांनी हातात धरला आहे. आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज शेअर करीत विकी-कतरिना म्हणतात, “आम्ही आमच्या आयुष्यातील एका सर्वांत सुंदर अध्यायाची सुरुवात करीत आहोत. आमचं मन आनंद आणि कृतज्ञतेनं भरून आलं आहे.”

विकी-कतरिना यांनी आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज शेअर करताच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनघा अतुल, तितीक्षा तावडे, पूर्वा कौशिक या मराठी अभिनेत्रींनी दोघांना कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच अनेक बॉलीवूड कलाकारांनीसुद्धा दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कतरिना कैफ इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, २०२१ मध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

अशातच आता लग्नानंतर चार वर्षांनी कतरिना आणि विकी दोघे आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा बेबी बंप असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून अभिनेत्री आई होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती. अखेर आता या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.