अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ‘फोन भूत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या कतरिना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘फोन भूत’च्या प्रमोशनदरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘फोन भूत’च्या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये कतरिनाने उरी : द सर्जिकल स्ट्राइक चित्रपटातील फेमस डायलॉग म्हणत चाहत्यांची मनं जिंकली. कतरिनाने “हाऊ इज द जोश” असं म्हणताच चाहत्यांनीही प्रतिसाद देत “हाय मॅम”, असा रिप्लाय दिला. कतरिनाचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा >> Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

हेही वाचा >> भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया ड्रग्ज केस प्रकरण, एनसीबीकडून २०० पानांचं आरोपपत्र दाखल

२०१९ साली प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ चित्रपटातील विकी कौशलचा “हाऊ इज द जोश” हा लोकप्रिय डायलॉग आहे. विकी कौशलचा हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला होता. ‘फोन भूत’च्या प्रमोशनदरम्यान कतरिनाने हा डायलॉग घेतल्याने पती विकीच्या या फेमस डायलॉगची तिलाही भूरळ पडली आहे, हे दिसून आलं. कतरिना आणि विकीने डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही अनेकदा मुलाखतीदरम्यान त्यांच्या लग्नानंतरच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसतात.

हेही पाहा >> Photos : “बेरोजगारीमुळे मी केस वाढवले पण…”, गौरव मोरेने सांगितला गुगलची अ‍ॅड मिळाल्याचा ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिनाचा ‘फोन भूत’ चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी आणि इशान खट्टर चित्रपटात कतरिनासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.