सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. माध्यमांसमोर दोघंही एकमेकांबद्दल अनेकदा बोलताना दिसतात. आज १५ मार्च रोजी सिद्धार्थ अभिनीत ‘योद्धा’ चित्रपट प्रदर्शित झाला. गेले काही दिवस सिद्धार्थने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक शहरांना भेट दिली. कियाराने सिद्धार्थचं कौतुक करत नुकतीच एक स्टोरी शेअर केली आहे.

कियाराने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘योद्धा’ चित्रपटातील सिद्धार्थचा फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देतं कियाराने लिहिले, ” करण जोहर, शशांक खेतान आणि धर्मा मूवीज तुम्ही या चित्रपटाचं अप्रतिम सादरीकरण केल्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन.”

पुढे सिद्धार्थचं कौतुक करत तिने लिहिले, “सिद्धार्थ मल्होत्रा तुझा आम्हाला खूप अभिमान वाटतो. या जॉनरमधील ‘योद्धा’ चित्रपटाचं लेखन सर्वोत्तम झालं आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा असं वाटतच नाही आहे की, हा तुमचा पहिलाच चित्रपट आहे.”

हेही वाचा… “माहित नाही ते कुठे आहेत”, वडिलांबद्दल सिद्धार्थ चांदेकरचं विधान; म्हणाला, “त्यांनी कधीच…”

प्रेक्षकांना आवाहन करत कियाराने लिहिले, “दिशा पटानी आणि राशी खन्ना या दोन लेडी योद्धांसाठी हा चित्रपट नक्कीच बघा. चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांचं आणि टीमचं अभिनंदन.”

हेही वाचा… पहिली भेट, एक वर्ष डेट अन्…, अरबाज खानने सांगितली त्याची आणि शुराची लव्हस्टोरी, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, योद्धा चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, राशी खन्ना आणि दिशा पटानीने प्रमुख भूमिका साकारली आहे. मध्यंतरी हा चित्रपट २०२३ च्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं होतं पण, पुन्हा तो लांबणीवर पडला. अखेर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्लेन हायजॅकवर आधारित असून या चित्रपटात पुन्हा एकदा सिद्धार्थने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे.