कियारा अडवाणी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आपल्या अभिनयाने कियाराने अनेकांना भूरळ पाडली आहे. आत्तापर्यंत कियाराने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता लवकरच ती फरहान खान दिग्दर्शित ‘डॉन ३’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रणवीर सिंहची प्रमुख भूमिका आहे. आता डॉन ३ साठी कियारा अडवाणीने किती पैसै घेतले याबाबतची माहिती समोर आली आहे.
डॉन ३ चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. सुरुवातीला या भूमिकेसाठी अभिनेत्री क्रिती सेनॉनचा विचार करण्यात आला होता. मात्र, आता कियाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. डॉन ३ चित्रपटासाठी कियाराने तगडे मानधन घेतले असल्याची चर्चा सुरु आहे. बॉलीवुड हंगामाच्या बातमीनुसार कियाराने या चित्रपटासाठी तब्बाल १२ कोटी रुपये फी घेतली आहे. डॉन ३ साठी कियाराने आकारलेली फी ही आत्तापर्यंतच्या तिच्या मानधनापैकी सगळ्यात जास्त असल्याचे सांगण्यात येते. अभिनेत्रीने वॉर चित्रपटासाठी जेवढे मानधन घेतले होते त्याच्यापेक्षा दुप्पट मानधन तिने ‘डॉन ३’ साठी घेतले आहे.
फ्रेब्रुवारी २०२३ मध्ये डॉन ३ चित्रपटासाठी कियारा नावाची घोषणा झाली होती. फरहान अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. डॉन २ मध्ये शाहरुखबरोबर प्रियांका चोप्रा झळकली होती. त्यामुळे डॉन ३ मध्येही जंगली बिल्ली म्हणून प्रियांकाच दिसणार अशीही चर्चा होती. मात्र, शाहरुख व प्रियांकाने या चित्रपटातून काढता पाय घेतल्यानंतर रणवीर व कियाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. डॉन ३ च्या माध्यमातून रणवीर व कियाराची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘डॉन’ सिरीजमधील या अगोदरचे दोन्ही चित्रपट चांगलेच गाजले होते. चित्रपटाच्या पहिल्या भागात अमिताभ बच्चन यांनी डॉनची भूमिका साकारली होती. व दुसऱ्या भागात शाहरुख खान डॉन बनला होता. आता ‘डॉन ३’ मध्ये रणवीर कपूर व कियारा अडवाणी आपल्या अभिनयाची जादू चालवणार का हे लवकरच बघायला मिळेल.