अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केलं. जैसलमेरला सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला होता. दोघांच्याही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सिद्धार्थ-कियाराने त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी विशेष तयारी केली होती. याबद्दल त्यांच्या लग्नाला गेलेल्या संगीतकाराने खुलासा केला आहे.

हेही वाचा : “‘त्या’ घटनेनंतर आम्ही पळून जाऊन लग्न केलं”, आदेश बांदेकरांनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाले, “सुचित्राला…”

संगीतकार गणेशने ‘पिंकविला’शी संवाद साधताना म्हणाला, “कियाराने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये माझं संगीत पहिल्यांदा ऐकलं होतं. त्यानंतर दोघांचं लग्न ठरल्यावर तिने मला कॉल केला. त्या दोघांच्या लग्नासाठी मी एक खास गाणं तयार केलं होतं. ते संपूर्ण मॅशअप ऐकताना कियारा खूपच भावुक झाली होती. त्या दोघांनी त्यांच्या लग्नासाठी, सगळ्या पाहुण्यांसाठी खूपच सुंदर व्यवस्था केली होती.”

हेही वाचा : Video : आकर्षक सजावट, पाहुण्यांची मांदियाळी, वरात, वरमाळा अन्..; परिणीती चोप्राने शेअर केला लग्नाचा खास व्हिडीओ

“सिद्धार्थ आणि कियारावर बनवलेलं ते खास गाणं मी त्यांच्या हळदी समारंभात लावलं होतं. ‘शेहशाह’, ‘कबीर सिंग’ अशा त्यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या सगळ्या चित्रपटांमधील गाणी घेऊन मी एक संपूर्ण मॅशअप बनवलं होतं. ते दोघेही त्या मॅशअपवर आनंदाने नाचले. हळदीच्या दिवशी ती सगळी गाणी ऐकून कियारा खूपच भावुक झाली होती.” असं डीजे गणेशने सांगितलं.

हेही वाचा : “माझ्या कमी वजनावरून…” बिग बॉस १६ फेम अभिनेत्रीने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, “प्रत्येकाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ आणि कियाराच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्री शेवटची ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर झळकली होती. लवकरच कियारा ‘वॉर २’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. तसेच सिद्धार्थ मल्होत्राचा बहुचर्चित ‘योद्धा’ चित्रपट येत्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘शेहशाह’च्या यशानंतर कियारा-सिद्धार्थच्या जोडीला प्रेक्षक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.