आमिर खानची दुसी पत्नी व चित्रपट निर्माती किरण रावने आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाशी कसं नातं आहे, याबद्दल खुलासा केला आहे. २००५ मध्ये किरण रावने आमिर खानशी लग्न केलं होतं. पण आपण फक्त आमिरशी नाही तर एका लग्न केलं होतं, असं ती म्हणाली. “मी खूप नशीबवान आहे की मी एका कुटुंबाशी लग्न केलं आणि अशा कुटुंबाशी ज्यांच्यावर माझं प्रेम आहे,” असं किरणने सांगितलं. तसेच आपलं आमिरच्या आई झीनत हुसैन यांच्यावर खूप प्रेम आहे, मला त्या खूप आवडतात, असं किरण म्हणाली.

“ती माझ्यावर ओरडते”, घटस्फोटानंतर किरण रावसह काम करण्याबाबत आमिर खान म्हणाला, “आम्ही एकत्र…”

किरणने सांगितलं की आमिर खानचं कुटुंब खास आहे आणि २००२ मध्ये आमिरपासून घटस्फोट घेतल्यानंतर रीनाने कधीही कुटुंबाला सोडलं नाही. “रीनाने कधीही कुटुंब सोडलं नाही. आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला तेव्हा जसं होतं तसंच नंतरही होतं. कुटुंबातील सगळे रीनाची खूप काळजी घेत होते. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा रीना आमिरच्या कुटुंबाचा एक भाग होती. नंतर आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी झालो, कारण ती व्यक्ती म्हणून अप्रतिम आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, ती माझी जवळची मैत्रीण आहे,” असं किरण म्हणाली.

किरण रावमुळे आमिर खान-रीना दत्ताचा घटस्फोट झाला? दिग्दर्शिका म्हणाली, “लगानच्या शूटिंगपासून आम्ही…”

किरण आणि तिचा मुलगा आझाद, आमिर आणि त्याची मुलं आयरा आणि जुनैद हे सर्वजण एकमेकांच्या जवळ राहतात. ते कुटुंब म्हणून एकमेकांच्या खूप जवळ आहेत. आयरा व नुपूर यांच्या लग्नाची तयारी सर्वांनी मिळून केली, असंही किरणने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Kiran Rao (@raodyness)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण आणि आमिरने २००५ मध्ये लग्न केलं आणि सरोगसीद्वारे मुलगा आझादचे स्वागत केले. या जोडप्याने २०२१ मध्ये घटस्फोट घेत असल्याचं जाहिर केलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर एक संयुक्त निवेदन शेअर केलं आणि विभक्त होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.