भारतातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक असलेले किशोर कुमार आजही त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांच्या आठवणीत जिवंत आहेत. १९७० आणि १९८० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सदाबहार गाणी दिली. किशोर कुमार यांनी त्यांच्या सुमधूर आवाजाने श्रोत्यांच्या मनावर राज्य केले होते.

किशोर कुमार यांच्या मुलाच्या बाबतीत एक दुर्दैवी गोष्ट घडली होती. त्यामुळे १९८१ मध्ये किशोर कुमार यांना हृदयविकाराचा झटका आला होता. किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्या प्रसंगाचा उल्लेख केला.

रेडिओ नशाशी बोलताना अमित कुमार यांनी सांगितलं की, वडील किशोर कुमार खूप आनंदी होते, कारण मुलाचे लग्न कोलकात्यातील एका मुलीशी होणार होते. “माझे लग्न १९८१ मध्ये होणार होते, ते एक अरेंज्ड मॅरेज होते. त्यामुळे माझे वडील खूप आनंदी होते. त्यांनी लग्नासाठी मुंबईतील, इंडस्ट्रीतील सर्वांना कोलकात्यात बोलवायचं असा प्लॅन केला होता. माझी होणारी बायको कोलकात्याची होती,” असं अमित म्हणाले.

लग्नाच्या १० दिवसाआधी समजलं की ती तरुणी…

अमित यांच्या लग्नानंतर किशोर कुमार यांना लग्नानंतर मध्य प्रदेशमधील खंडवा इथे राहायला जायचं होतं. “बाबा म्हणालेले, ‘तुला जे करायचं आहे ते कर, त्यानंतर तुझं लग्न होईल. नंतर तू सेटल होशील. मी खंडवा निघून जाईन आणि तुम्ही सर्वजण मला भेटायला या. पण जे घडलं ते त्यांना सहन झालं नाही. कारण माझं लग्न जिच्याबरोबर ठरलं होतं, ती तरुणी आधीच विवाहित होती. लग्नाच्या १० दिवस आधी आम्हाला हे कळलं होतं, त्यावेळी लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या होत्या,” असं अमित यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किशोर कुमार यांना आलेला हृदयविकाराचा झटका

किशोर कुमार यांनी मुलासाठी दुसरी मुलगी शोधायचा निर्णय घेतला. ज्यादिवशी लग्न होणार होतं, त्यादिवशी ते मुलासाठी मुलगी शोधायला कोलकात्याला गेले होते. “माझे लग्न २४ जानेवारी १९८१ रोजी होणार होतं. माझे वडील खूप हट्टी होते. ते म्हणाले, ‘मी जानेवारीला कोलकात्याला जाणार आणि तुझ्यासाठी मुलगी शोधेन.’ मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही हे सगळं का करताय?’ पण ते विमान बसले आणि विमान लँड होताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं होतं,” असं अमित म्हणाले.