Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection Day 4: सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाला समीक्षकांकडून कौतुक व दाद मिळाली नसली तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारच्या सुट्टीचा फायदा मिळाला, त्यादिवशी चित्रपटाने २५ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने २६ कोटींहून अधिक कमाई केली. दुसरीकडे, सोमवारी या चित्रपटाने सुमारे १० कोटींची कमाई केली आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यासाठी सलमानने घेतले एवढे कोटी; आकडा वाचून बसेल धक्का

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ‘किसी का भाई किसी की जान’ने १०.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. मात्र, रविवारच्या कमाईच्या आकड्यांनुसार ‘किसी का भाई किसी की जान’च्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसते. पण सुट्टीचा दिवस नसल्याने चित्रपटाचे इतके कलेक्शन ठीक मानले जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत जवळपास ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘किसी का भाई किसी की जान’मध्ये सलमान खानसह पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात जस्सी गिल, राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगम हे सलमान खानच्या भावांच्या भूमिकेत आहेत. पलक तिवारी, शहनाज गिल आणि विनाली भटनागर त्यांच्या गर्लफ्रेंड्स भूमिकांमध्ये दिसत आहेत. जगत्पती बाबू आणि बॉक्सर विजेंदर सिंग या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहेत. तर, व्यंकटेश दग्गुबती यांनी पूजा हेगडेच्या भावाची भूमिका साकारली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईदच्या मुहूर्तावर २१ एप्रिलला सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.