scorecardresearch

‘विक्रम वेधा’बाबत केआरकेने केलेलं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “हृतिकने अमिताभ यांची…”

विक्रम वेधा’ मधील एक विशिष्ट सीन त्याच्या देशद्रोही चित्रपटातून कॉपी करण्यात आला होता.

‘विक्रम वेधा’बाबत केआरकेने केलेलं ट्वीट चर्चेत, म्हणाला, “हृतिकने अमिताभ यांची…”
review of vikram vedha

केआरके हे कायमच चर्चेत असलेलं एक नाव, आपल्या ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडवर कायमच तो टीका करत असतो. बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचं तो समीक्षण करत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. ‘लाइगर’ या चित्रपटाबाबत केआरकेने ट्विट करून त्याचं मत व्यक्त केलं होत. केआरकेने हा चित्रपट सपशेल आपटणार असल्याची भविष्यवाणी केली होती. नुकतंच त्याने ‘विक्रम वेधा’ चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केलं आहे. याआधी त्याने आपण या चित्रपटाचे समीक्षण करणार आहोत हे स्पष्ट केले होते.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये असं लिहलं आहे की ‘माझ्या मित्रांनी ‘विक्रम वेधा’ पाहिला. मध्यंतराच्या आधी हृतिक रोशन अमिताभ बच्चन यांना कॉपी करतो तर मध्यंतरानंतर तो अल्लू अर्जुनला कॉपी करतो आहे. या चित्रपटाच्या शेवटी सैफ अली खान, हृतिक रोशनमध्ये एक ऍक्शन सीन आहे जो भोजपुरी चित्रपटातील ऍक्शन सीनपेक्षा खराब आहे. याचाच अर्थ चित्रपट जुनाच आहे आणि त्यापेक्षा यातना देणारा आहे. ‘विक्रम वेधा’ या चित्रपटानंतर केआरके चित्रपटांचं समीक्षण करणार नाही’, असं त्यानेच आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे.

पोन्नियन सेल्वन १’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नवा वाद, चित्रपटगृहाच्या मालकांना धमक्यांचे ई-मेल

२०२० मध्ये त्याने स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं होत. त्यासाठीच त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच तो पुन्हा ट्विटरवर सक्रिय झाला आहे.यापूर्वी देखील केआरकेने दावा केला होता की, ‘विक्रम वेधा’ मधील एक विशिष्ट सीन त्याच्या देशद्रोही चित्रपटातून कॉपी करण्यात आला होता.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानंतर सध्या ‘विक्रम वेधा’ चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले आहे. ‘विक्रम वेधा’ हा ३० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 16:16 IST

संबंधित बातम्या