एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचं सांगितलं होतं. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. ब्लू टिक असलेल्या अनेक अकाऊंटचं टिक त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काढून टाकण्यात आलं आहे. ट्विटरने ब्लू टिक काढलेल्या यादीत अनेक सेलिब्रिटी, खेळाडू व राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.

बॉलिवूड अभिनेता व चित्रपट समीक्षक कमल आर खान(केआरके)च्या ट्विटर अकाऊंटचही ब्लू टिक काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर केआरकेने यासंबंधी ट्वीट केलं आहे. “बॉस एलॉन मस्कने राजकारणी व्यक्तींचे अकाऊंट्स सोडून बाकी सगळ्यांच्या अकाऊंटवरील वेरिफिकेशन टिक काढून टाकलं आहे. याचा अर्थ फक्त सामान्य माणूस नाही, तर एलॉन मस्कही राजकरण्यांना घाबरतो,” असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक दिग्गजांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली; अभिनेते, खेळाडूंचाही समावेश!

केआरकेने दुसरं एक ट्वीट करत ब्लू टिकसाठी पैसे भरल्याचं सांगितलं आहे. “तीन दिवसांपूर्वीच मी सबस्क्रिप्शन फी भरली आहे, तरीही तुम्ही माझं वेरिफिकेशन टिक का काढलं?” असा प्रश्न त्याने ट्वीटमधून विचारला आहे.

हेही वाचा>> केदार शिंदेंच्या लेकीने शेअर केला शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो, दोघांमधील नेमकं नातं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्कनं २० एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं जाहीर केलं होतं. पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ट्विटरनं कारवाई केलेल्या अकाऊंट्समध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, किंग खान शाहरूख, अमिताभ बच्चन, आलिया भट, रोहित शर्मा, विराट कोहली यांचा समावेश आहे.