नेटफ्लिक्सची पहिली भारतीय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड लोकप्रिय झाली. याच्या दुसऱ्या सीझनपेक्षा पहिला सीझन लोकांनी डोक्यावर घेतला त्यामागे बरीच कारणं होती, त्यांपैकीच एक कारण म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैत हिने साकारलेली कुक्कु ही भूमिका. एका तृतीयपंथी व्यक्तीची अत्यंत बोल्ड भूमिका साकारल्याने कुब्राला चांगलीच लोकप्रियता मिळाली. नंतर तिने काही चित्रपटांतही काम केलं.

गेल्याच वर्षी कुब्राने तिचं आत्मचरित्र ‘ओपन बुक : नॉट क्वाइट अ मेमॉयर’ प्रकाशित केलं. या आत्मचरित्रात तिने तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील बऱ्याच घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. नुकतंच कुब्राने ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटसृष्टीतील तिच्या अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये काम करताना नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल कुब्राने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “महाराष्ट्राची जनता…” आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टवरील सिमी गरेवाल यांची कमेंट चर्चेत

‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुब्रा आणि नवाज यांच्यात बरेच बोल्ड सीन्स दाखवण्यात आले होते. त्याबद्दल बोलताना कुब्रा म्हणाली, “नवाजुद्दिनबरोबर काम करताना मला खूप काही शिकायला मिळालं, शिवाय तो एक उत्तम सहकलाकार आहे. वेबसीरिजमध्ये आमच्यात बरेच सेक्स सीन्स तुम्हाला पाहायला मिळतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का की, नवाजुद्दिन हा प्रचंड लाजाळू आहे. त्याच्याशी अत्यंत प्रेमाने बोलून ते सीन्स आम्ही करवून घेतले. मी बऱ्याचदा स्वतः त्याच्या गालावर किस करायचे अन् म्हणायचे, ‘चल ना सेक्स सीन करू या.’ मी एक अभिनेत्री आहे, मला सेटवर हे असं मोकळं वातावरण निर्माण करावं लागतं, हेच आमचं काम आहे.”

View this post on Instagram

A post shared by Kubbra Sait (@kubbrasait)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सेक्रेड गेम्स’मधील कुब्राचं कुकु हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. यातील कुब्रा आणि नवाजची केमिस्ट्रीसुद्धा लोकांना आवडली. यानंतर कुब्राने बऱ्याच चित्रपटांत काम केलं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमध्येही कुब्राची महत्त्वाची भूमिका होती.