कुणाल खेमू व् सोहा अली खान यांनी २०१५ साली विवाह केला आणि काही वर्षांनी त्यांना एका कन्यारत्नाची प्राप्ती झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुणालने शर्मिला टागोर यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचा अनुभव सांगितला. कुणालच्या म्हणण्यानुसार, त्या भेटीचा अनुभव तितकासा खास नव्हता. त्यावेळी शर्मिलाजींनी त्याच्याकडे नीट पाहिलंसुद्धा नव्हतं.

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत कुणालने सांगितलं, “पहिल्या भेटीत शर्मिलाजींनी माझ्याकडे नीट पाहिलंसुद्धा नाही.” ही भेट सोहा अली खानच्या प्रियकराच्या भूमिकेतून पहिली असली तरी त्याआधी त्यांची एका फिल्म सेटवर भेट झाली होती. कुणाल म्हणाला, “आम्ही ‘९९’ चित्रपटाच्या सेटवर होतो. एका हॉटेलमध्ये शूटिंग सुरू होतं आणि मी केवळ बाथरोबमध्ये होतो. त्याच वेळी शर्मिला टागोर येणार होत्या आणि मला कपडे बदलायला वेळही नव्हता. त्या वेळी खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं.”

हेही वाचा…Video : बॉलीवूडची ‘स्त्री’ करणार दिवाळीची साफसफाई; मराठमोळ्या शैलीत श्रद्धा कपूर म्हणाली, “घर चकचकीत…”

कुणालने पुढे, “जेव्हा औपचारिकरीत्या त्यांची भेट झाली तेव्हा शर्मिला टागोर मॅगझिन वाचत होत्या. त्यांनी ‘हॅलो’ म्हटलं आणि मीही ‘हॅलो’ म्हटलं. मग त्यांनी माझ्याकडे न पाहताच प्रश्न विचारायला सुरुवात केली, ‘तू काय करतोस? कोणते चित्रपट केलेत? तू कुठला आहेस?’ जवळपास १५ मिनिटं उलटली होती; पण माझी आणि त्यांची नजरानजर झाली नव्हती. मला घाम येत होता आणि मी मनातच विचार करीत होतो. ‘हे तर नोकरीच्या मुलाखतीसारखं वाटतंय. मला नोकरी मिळेल का?’ ”, असे सांगत हसत हसत त्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा…“…आणि सलमानने फुटपाथवरून गाडी चालवली”, ‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो पुढे म्हणाला, “मी सतत सोहाकडे पाहत होतो. जणू विचारत होतो, ‘या नेहमीच अशाच असतात का?’ ती पहिली भेट खूपच अवघड गेली होती.” मात्र, त्यानंतर शर्मिलाजींनी हळूहळू कुणालशी संवाद साधायला सुरुवात केली. लंडनमध्ये दोघे एकत्र स्वयंपाक करताना त्यांचा चांगला संवाद झाला. कुणाल सांगतो, “मला स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि त्यांनाही. त्यांनी मला कांदा चिरताना पाहिलं आणि विचारलं, ‘तू काय करतो आहेस?’ मी म्हणालो, ‘मी डाळ करतोय.’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘मी कोबी करतेय.’ मग आम्ही ठरवलं की, चला एकत्रच स्वयंपाक करू.”