७०चं दशक गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी लीना चंदावरकर एक आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या लीना यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला होता. अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेल्या लीना यांनी १९६८ साली ‘मन का मीत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्या चित्रपटानेच त्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्या रातोरात स्टार झाल्या.

प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच लीना यांनी १९७५ मध्ये उद्योजक सिद्धार्थ बंदोदकर यांच्याशी विवाह केला होता. सिद्धार्थ बंदोदकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बंदोदकर यांचे पुत्र होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर सिद्धार्थ यांच्याकडून रिव्हॉल्व्हर साफ करताना नजरचुकीने स्वत:लाच गोळी मारली होती. त्यानंतर ११ महिन्यांच्या उपचारानंतर त्यांच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच लीना विधवा झाल्या होत्या.

हेही वाचा>> Video : सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधील पदार्थांच्या चवीमागचं गुपित काय? महेश मांजरेकर म्हणाले, “याचे मसाले…”

पतीच्या निधनानंतर लीना नैराश्यात गेल्या होत्या. त्यानंतर १९७५ साली त्यांनी प्रसिद्ध अभिनेते व गायक किशोर कुमार यांच्याबरोबर ‘प्यार अजनबी है’ चित्रपटात काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. ते एकमेकांच्या प्रेमातही पडले होते. परंतु, किशोर कुमार यांनी लग्नासाठी विचारताच लीना यांनी साफ नकार दिला होता.

हेही वाचा>> GT vs MI सामन्यात अर्जुन तेंडुलकर-शुबमन गिल आमने सामने, सारा तेंडुलकरवरील ‘किसी का भाई किसी की जान’ मीम्स व्हायरल

किशोर कुमार यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर लीना लग्नासाठी तयार झाल्या. परंतु, किशोर कुमार यांची आधीच तीन लग्न झाल्यामुळे लीना यांचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते. लीना यांच्या वडिलांची लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी किशोर कुमार यांनी त्यांच्या घरी जाऊन गाणंही गायलं होतं. त्यानंतर लीना यांच्या वडिलांकडून लग्नासाठी परवानगी मिळाली होती.

हेही पाहा>> प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं मॅटर्निटी फोटोशूट, पोटावरील स्ट्रेचमार्कसह बिनधास्तपणे फ्लाँट केलं बेबी बंप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८० साली किशोर कुमार व लीना यांनी लग्नगाठ बांधली. लीना व किशोर कुमार यांनी कोर्ट मॅरेज व हिंदू पद्धतीने दोनदा विवाह केला होता. हिंदू पद्धतीने लग्न करताना सात महिन्यांची गरोदर असल्याचा खुलासा लीना यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता. १९८७ साली किशोर कुमार यांचं निधन झालं. त्यानंतर त्या एकट्या पडल्या. त्यांना एक मुलगाही आहे.