सध्या आयपीएलचा नवा हंगाम जोरदार सुरू आहे. मंगळवारी(२५ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना खेळवला गेला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातकडून मुंबईचा दारुण पराभव करण्यात आला. या सामन्यात शुबमन गिलने अर्ध शतक झळकावलं. तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अर्जुन तेंडुलकरने मात्र अवघ्या १३ धावा केल्या. मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचे पोस्टरवरील मीम सोशल मीडियावर फिरताना दिसत होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर व शुबमन गिल यांचे मजेशीर मीम नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहेत. हेही वाचा>> ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईचा वेग मंदावला, पाचव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी "किसी का भाई किसी की जान मे अक्सर जीत जान की होती है" असं मीम तयार करण्यात आलं आहे. "सचिन व सारा शुबमन गिलचं अर्ध शतक बघताना" हेही वाचा>> Video : सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधील पदार्थांच्या चवीमागचं गुपित काय? महेश मांजरेकर म्हणाले, “याचे मसाले…” "भैय्या हार गये तो क्या हुआ, सय्या जीत गए" "किसी का भाई किसी की जान क्या करे हमारा सारा भाभी जान" सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर व शुबमन गिल यांच्यावरील हा मजेशीर मीम. हेही वाचा>> “शुभेच्छा द्या टोमणे नको…” अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ पोस्टवर चाहतीची कमेंट, प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी जाहिरातीमुळे…” दरम्यान, सारा तेंडुलकरच नाव शुबमन गिलबरोबर जोडलं गेलं होतं. ते दोघं डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, नंतर शुबमन गिलला बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानबरोबर स्पॉट करण्यात आलं होतं. आता शुबमन व सारा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.