अभिनेत्री माधुरी दीक्षित व त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांची जोडी सध्या ‘पंचक’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ९० च्या दशकात माधुरीने बॉलीवूडवर अधिराज्य गाजवलं होतं. तिचा चाहतावर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने डॉ. नेनेंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. १९९९ मध्ये माधुरी विवाहबंधनात अडकली. परंतु, या दोघांच्या नात्याबद्दल जेव्हा अभिनेत्रीच्या घरी समजलं तेव्हा तिच्या आईची प्रतिक्रिया काय होती याविषयी माधुरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

माधुरी दीक्षित लव्हस्टोरीबद्दल सांगताना म्हणाल्या, “आमची पहिली भेट माझ्या भावाच्या घरी पार्टीमध्ये झाली होती. माझ्या भावाच्या डोक्यात अनेक गोष्टी सुरू होत्या पण, त्याने मला काहीच कल्पना दिली नव्हती. तेव्हा याचे (श्रीराम नेने) आई-बाबा देखील आले होते. सगळं ठरवून भेटलो असतो, तर कदाचित मी तयार झाले.”

हेही वाचा : ‘सैराट’ फेम आर्चीचं खरं नाव रिंकू नव्हे तर…; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

“पहिली भेट झाल्यावर आम्ही एकमेकांना फक्त ३ महिने डेट केलं. त्यानंतर लगेच आमचं लग्न झालं. त्या ३ महिन्यात मला खरंच जाणवलं की, या व्यक्तीबरोबर आपण आयुष्य घालवू शकतो. मी लगेच माझ्या आईला या नात्याबद्दल सांगितलं. तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया होती, नक्की ना? माझ्याकडून तुला कोणतीही घाई नाही. तुला योग्य वाटेल तो निर्णय विचार करून घे. त्यावेळी मी आईला हो…माझा विचार करून झालाय असं सांगितलं होतं.” असा खुलासा अभिनेत्रीने केला.

हेही वाचा : Video: धकधक गर्ल माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह सिद्धिविनायकाच्या चरणी, निमित्त होतं खास…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी व श्रीराम नेने यांच्या लग्नाला नुकतीच २४ वर्षे पूर्ण झाली. या जोडप्याला रायन आणि अरीन अशी दोन मुलं आहेत. गेली अनेक वर्षे अभिनेत्री अमेरिकेत राहत होती. काही वर्षांपूर्वीच ती कुटुंबासह भारतात स्थायिक झाली. आता लवकरच माधुरी व श्रीराम नेनेंची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.