Madhuri Dixit And Kartik Aaryan Dance : ‘भुल भुलैया ३’ चित्रपटाने यंदा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या तिघांना एकत्र स्क्रीनवर पाहणं सिनेरसिकांसाठी पर्वणी ठरलीच पण, त्यापेक्षाही चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या सगळ्यांनी प्रचंड धमाल मस्ती केल्याचं पाहायला मिळालं. माधुरी-विद्याच्या डान्स जुगलबंदी असो किंवा कार्तिक आर्यनचा हटके अंदाज या सगळ्या गोष्टींची प्रेक्षकांना भुरळ पडली होती.

माधुरी दीक्षितला ( Madhuri Dixit ) बॉलीवूडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळखलं जातं. तिच्याबरोबर डान्स करायची एक तरी संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. नुकतंच कार्तिक आर्यनचं हेच स्वप्न साकार झालंय. कारण, ऑफस्क्रीन या दोघांनी रोमँटिक गाण्यांवर सुंदर डान्स केला आहे. याचा अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण, या व्हिडीओच्या शेवटी नेमकं काय घडलंय तुम्ही एकदा पाहाच…

हेही वाचा : ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला ११ वर्ष पूर्ण! प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट, म्हणाली, “ही मालिका माझ्या पदरात…”

कार्तिक आर्यन आणि माधुरी दीक्षित यांनी डान्स करण्यासाठी ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटातलं ‘पहेला पहेला प्यार हैं’ हे गाणं निवडलं. या ३० वर्षांपूर्वींच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दोघेही छान दिसत होते. हे गाणं मूळ सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालं आहे. कार्तिक-माधुरीने आता पुन्हा एकदा जुन्या गाण्याच्या आठवणी ताज्या करत सुंदर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. पण, डान्स करताना शेवटी एक मोठा ट्विस्ट येतो… तो म्हणजे माधुरी मंजुलिकासारखा शेवटी कार्तिक आर्यनचा गळा धरते. गळा पकडल्यावर कार्तिकला धक्का बसतो आणि तो चित्रपटातील “हे हरिराम…” हा डायलॉग शेवटी बोलत असल्याचं पाहायला मिळतं.

माधुरी ( Madhuri Dixit ) आणि कार्तिकची ही क्यूट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली आहे. या व्हिडीओला अवघ्या २४ तासांत ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी सुद्धा या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : “भुवनेश्वरी नथ घालायला विसरली अन्…”, कविता मेढेकरांनी सांगितला मालिकेच्या शूटिंगचा किस्सा; म्हणाल्या, “दीड तास…”

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ( Madhuri Dixit ) माधुरी-कार्तिकच्या ‘भुल भुलैया ३’बद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०८.५२ कोटी कमावले आहेत. त्यामुळे ही कमाई पाहता या चित्रपटाने यावर्षीच्या कलेक्शनच्या आकडेवारीत एक नवीन इतिहास रचल्याचं स्पष्ट झालं आहे.