Madhuri Dixit : मालिकेतील कलाकारांना सन्मान व्हावा, त्यांना प्रेक्षकांच्या प्रेमाची पोचपावती मिळावी याकरता प्रत्येक मराठी वाहिनी दरवर्षी पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करते. सध्या सर्वत्र ‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार २०२५ या सोहळ्याची चर्चा चालू आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. यासाठी सगळ्याच मालिकांमध्ये चुरस रंगणार आहे. तर, मालिकांमधले लोकप्रिय कलाकार या सोहळ्यात परफॉर्मन्स सुद्धा सादर करतील. त्यामुळे प्रेक्षक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या सोहळ्याला आणखी एक खास व्यक्ती उपस्थित राहणार आहे. बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीची एव्हरग्रीन अभिनेत्री ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने यावर्षी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. सध्या माधुरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

यावर्षी पार पडणाऱ्या ‘स्टार प्रवाह’च्या पुरस्कार सोहळ्यात माधुरी दीक्षित सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. अभिनेत्रीने खास मखमली सुंदर अशी साडी नेसून पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली होती. यावेळी तिने गळ्यात मोत्याचा सुंदर असा नेकलेस घातला होता. या इंडो-वेस्टर्न साडी लूकमध्ये माधुरी अतिशय सुंदर दिसत होती.

माधुरीची ही रॉयल साडी श्यामल आणि भूमिका यांनी डिझाइन केली आहे. ‘पिंकव्हिला’ने दिलेल्या माहितीनुसार या साडीची किंमत तब्बल १ लाख ८० हजार एवढी आहे.

‘धकधक गर्ल’ने ही सुंदर साडी नेसून ‘स्टार प्रवाह’च्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. सगळ्यांनी अभिनेत्रीच्या आजूबाजूला गर्दी केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आता माधुरी सोहळ्यात सगळ्या कलाकारांना कसं मार्गदर्शन करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्टार प्रवाह’ वाहिनीवर यंदा पुरस्काराच्या शर्यतीत ‘साधी माणसं’, ‘मुरांबा’, ‘शुभविवाह’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’, ‘उदे गं अंबे’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग!’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’, ‘येड लागलं प्रेमाचं’, ‘तू ही रे माझा मितवा’ आणि ‘अबोली’ अशा एकूण १४ मालिका असणार आहेत. आता या मालिकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.