सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं रविवारी (१२ मार्च) मुंबईमधील राहत्या घरी निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. रविवारी दुपारी वरळी येथील स्मशानभूमीमध्ये स्नेहलता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माधुरी तिचे पती श्रीराम नेने यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. दरम्यान श्रीराम नेने यांनी स्नेहलता दीक्षित यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “रशियन मुलींचा वापर करुन…” सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात व्यावसायिकाच्या पत्नीचे पुन्हा एकदा गंभीर आरोप

माधुरी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे बऱ्याचदा आईबरोबरचे फोटो शेअर करताना दिसली. तिचं तिच्या आईवर जिवापाड प्रेम होतं. आईच्या निधनानंतर तिने खास फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. श्रीराम नेने यांचंही माधुरीच्या आईबरोबर खास नातं होतं. त्यांनी भावूक होत स्नेहलता दीक्षित यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “आज सकाळी उठले आणि…”

श्रीराम नेने म्हणाले, “आमच्या लाडक्या आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये निधन झालं. मी भावनिक व शारीरिक दृष्टीने खचलो आहे. पण माझे कुटुंब, मित्र आणि तुमच्या प्रेमामुळे हे सगळं सहन करण्याची ताकद मला मिळाली. आम्ही त्यांना कधीच विसरु शकत नाही. कायम त्यांची आठवण येत राहील”.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या सासूबाईंना पाहिलंत का? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी यांना…”

२०२२मध्ये माधुरीने तिच्या आईचा ९०वा वाढदिवसही साजरा केला. आईच्या ९०व्या वाढदिवसानिमित्तही तिने खास फोटो शेअर केले होतं. आईच्या निधनानंतर माधुरी भावूक झाली आहे. तिला आईची आठवण सतावत आहे. स्नेहलता यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत माधुरी म्हणाली, “आज सकाळी उठले आणि मला आईची खोली रिकामी दिसली. जीवन कसं जगायचं हे तिने आम्हाला शिकवलं. तिने बऱ्याच लोकांना खूप काही दिलं. तिची आम्हाला खूप आठवण येईल”.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit mother passed away at the age of 91 sriram nene share emotional post on instagram see details kmd
First published on: 13-03-2023 at 13:20 IST