माधुरी दीक्षितने ९०च्या दशकात प्रचंड मेहनत करून बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आपला सहज सुंदर अभिनय आणि नृत्याच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला आहे. या सगळ्या काळात माधुरीला तिच्या आईची मोठी साथ लाभली. त्यांनी प्रत्येक गोष्टीत लेकीला खंबीरपणे पाठिंबा दिला.

गेल्यावर्षी १२ मार्च २०२३ रोजी अभिनेत्रीची आई स्नेहलता यांचं मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. आयुष्यातील प्रत्येक वळणावर आपल्या बरोबर असणाऱ्या आईला दूर जाऊन आज एक वर्ष पूर्ण झाल्याने माधुरीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

माधुरी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच आईबरोबरचे खास फोटो शेअर करायची. तिचं तिच्या आईवर जिवापाड प्रेम होतं हे या प्रत्येक फोटोंमधून दिसून येतं. याशिवाय माधुरीने दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचा ९० वा वाढदिवस देखील मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

हेही वाचा : चुलीवरचं जेवण, प्रशस्त जागा अन्…; ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याचं मुंबईत आहे फार्महाऊस, सर्वसामान्यांसाठी केलं खुलं

“आई तुला जाऊन आज वर्ष झालं. तुझ्या जाण्याचं दु:ख कायम मनात राहणार. आई, तुझी आठवण सदैव आम्हाला येत असते. आमचं सर्वांचं तुझ्यावर मनापासून प्रेम असून प्रत्येक क्षणाला तुझा सहवास आम्हाला जाणवत राहतो. आमच्या आठवणींमध्ये तू कायम राहणार आहेस.” अशी भावुक पोस्ट माधुरीने आईच्या आठवणीत शेअर केली आहे.

हेही वाचा : Video : “जब तक तुम्हारा बाप जिंदा है…”, शाहरुख खानने पत्नी गौरी व मुलांना दिला खास मेसेज, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरीने शेअर केलेल्या या भावुक पोस्टवर सोनाली बेंद्रे, सुनील शेट्टी, रेणुका शहाणे, फराह खान यांनी कमेंट करत अभिनेत्रीच्या आईला आदरांजली वाहिली आहे.