Madhuri Dixit shared video: बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या चित्रपटांमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून ती तिच्या कॅनडामधील शोमुळे चर्चेत आहे.
टोरंटोमध्ये माधुरी दीक्षितचा एक शो झाला. या शोमध्ये अभिनेत्रीने डान्स परफॉर्मन्स केला. मात्र, वाद एका वेगळ्याच गोष्टीमुळे झाला. माधुरी दीक्षित या शोमध्ये उशिरा पोहोचली. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी दर्शवली. काहींनी अभिनेत्रीला ट्रोल केले. माधुरीने मात्र यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
आता माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरून पुन्हा चर्चा होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये माधुरी एका ठिकाणी फिरायला गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. ती निसर्गाच्या सहवासात असून, थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचे दिसत आहे. तिने डोक्याला टोपी, काळ्या रंगाचा कोट, बूट, गळ्यात मफलर घातले आहेत. तसेच, तिने गॉगलदेखील लावला आहे. या लूकमध्ये माधुरी नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती एका ठिकाणी पाणीदेखील दाखवत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, ‘ही शांतता आणि हा एक क्षण’, अशी कॅप्शन दिली आहे. माधुरी तिच्या सुट्यांचा आनंद घेत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्याचे, तिच्या कपड्यांचे नेटकरी कौतुक करीत असल्याचे दिसत आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर. माधुरीजी तुम्ही स्टायलिश आणि स्मार्ट आहात”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप क्यूट. मला आऊटफिट आवडले”, एका नेटकऱ्याने लिहिले, “खूप सुंदर”, अशा अनेक कमेंट्स माधुरीच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत माधुरीचे कौतुक केले आहे.



माधुरी दीक्षित फक्त चित्रपटांतच नाही, तर विविध टीव्ही शोमध्येदेखील दिसते. काही डान्सच्या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणूनदेखील काम करते. माधुरी ‘भूल भुलैय्या ३’मध्ये दिसली होती. आता आगामी काळात कोणत्या भूमिकेत दिसणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
