भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून देशातील कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. आंदोलक कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ब्रिजभूषण यांना लवकरात लवकर पदावरून हटवावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच त्याच्या विरोधात अटकेची मागणीही खेळाडू करत आहेत. देशातील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी पुढे आले आहेत. गीता-बबिता फोगाट यांचे वडील महावीर फोगाट यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा – बृजभूषण सिंह यांच्यासोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर साक्षी मलिकने सोडलं मौन; म्हणाली, “आमच्याकडे पर्याय…”

आता महावीर फोगट यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. महावीर फोगाट यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मदतीचे आवाहन केले आहे. आपल्याला इतर कलाकारांकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचं महावीर फोगट म्हणाले आहेत. आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटात महावीर सिंह फोगाट यांची भूमिका केली होती. आमिरच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक होता.

हेही वाचा – “…तर आम्ही सर्व पदकं परत करू”; दिल्ली पोलिसांशी झालेल्या वादानंतर बजरंग पुनियाचा केंद्र सरकारला इशारा!

‘इंडिया टुडे’शी बोलताना महावीर फोगट म्हणाले की, “मला कोणत्याही कलाकाराकडून आशा नाही, पण आमिर खानने कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यास मला ते चांगलं वाटेल. आम्हाला २०१४ मध्ये काही आरोपांबद्दल माहिती होती, पण तेव्हा काही बोलायचं नव्हतं. माझ्या तीन मुली त्या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होत्या. तेव्हा आम्ही बोललो असतो, तर अनुशासनहीनतेचे कारण देत सहभागी होऊ दिले नसते. कुस्तीपटूंना कोणत्याही प्रकारचं समर्थन मिळत नाहीये. सध्या ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई होणे अधिक महत्त्वाचे आहे. करा किंवा मरो अशी परिस्थिती आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करू, या लढ्यात आम्ही सगळे सोबत आहोत. बबिताही या लढ्याचा एक भाग आहे.”

हेही वाचा – VIDEO : “…म्हणून आम्ही देशासाठी पदके आणली होती का?”, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करत विनेश फोगाटला अश्रू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महावीर फोगाट यांनी गरज पडल्यास दिल्लीला घेराव घालू असा इशाराही दिला आहे. “पी टी उषा आणि मेरी कोम या महिला आहेत, त्यामुळे त्यांना याबद्दल जास्त माहिती आहे. आम्हाला चांगला पाठिंबा मिळत असून गरज पडल्यास आम्ही दिल्लीलाही घेराव घालू. आम्ही सरकारच्या विरोधात नाही तर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आहोत,” असं महावीर फोगाट म्हणाले.