Malaika Arora Restaurant: मलायका अरोराने नुकतंच व्यवसायक्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने तिचा मुलगा अरहान खानबरोबर नवीन व्यवसाय सुरू केला. या दोघांनी मुंबईतील वांद्रे भागात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन रेस्टॉरंट सुरू केलं. ‘स्कार्लेट हाऊस’ असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. तिच्या रेस्टॉरंटची खासियत असलेले काही पदार्थ आहेत. त्या पदार्थांची नावं आणि दर याची माहिती समोर आली आहे.

मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे. ‘स्कार्लेट हाऊस’ हे रेस्टॉरंट वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे. हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवलेले आहे. हे रेस्टॉरंट आतून खूपच सुंदर आहे. शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक लक्षवेधी ठरतो.

हेही वाचा – मलायका अरोराने मुंबईत ‘या’ ठिकाणी ९० वर्षे जुन्या बंगल्यात सुरू केले रेस्टॉरंट, पाहा Inside Photos

स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ बीना नोरोन्हा या आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात. रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे. आता मलायकाच्या रेस्टॉरंटमधील मेन्यू कार्डचा फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात काही पदार्थ व त्याचे दर लिहिले आहेत. हे पदार्थ मलायकाच्या रेस्टॉरंटची खासियत आहेत.

हेही वाचा – “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मेन्यू कार्डचा एक फोटो रिशेअर केला आहे, त्यानुसार या रेस्टॉरंटमध्ये पनीर ठेचा मिळतो. त्याची किंमत ५२५ रुपये आहे. मसाला खिचडी ५५० रुपयांची आहे, तर कॅरेमलाइज्ड ओनियन पास्ता ५५० रुपयांना मिळतो.

पाहा फोटो –

malaika arora menu card
स्कार्लेट हाऊसमधील मेन्यू कार्डचा फोटो (सौजन्य – मलायका अरोरा इन्स्टाग्राम)

मलायकाच्या या रेस्टॉरंटला अनेक सेलिब्रिटी भेट देताना दिसत आहेत. नुकतंच अरबाज खानचं कुटुंब ‘स्कार्लेट हाऊस’मध्ये लंचसाठी गेलं होतं. अरबाज खान, सलीम खान, सलमा खान, अलविरा खान, निर्वाण खान, हेलन यांच्यासह खान कुटुंबातील इतर सदस्यांनी या रेस्टॉरंटमध्ये मलायका अरोराबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला होता.

हेही वाचा – सुकन्या मोनेंच्या लेकीची कमाल! परदेशात ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; जुलियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास २०२४ मध्ये ती व अर्जुन कपूर वेगळे झाले. ६ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचं ब्रेकअप झालं.