अभिनेत्री मलायका अरोरा सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. मलायका सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी तिची सोशल मीडियावर क्रेझ आहे. तिच्या कामापेक्षाही ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. गेले अनेक वर्ष ती अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती, ज्यावरून ती आणि अर्जुन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. पण आता त्यामागील सत्य मलायकाने उघड केलं आहे.

मलायका व अर्जुनच्या नात्याची बी-टाऊनमध्ये नेहमीच चर्चा रंगताना दिसते. या दोघांच्या वयामध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. दोघांच्या नात्याच्या चर्चा सतत रंगत असताना मलायकाने आता आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली असल्याची चर्चा सुरु झाली होती. मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मलायका लाजताना दिसत होती. फोटो शेअर करत तिने म्हटलं की, “मी होकार दिला.” तिच्या या पोस्टनंतर तिने अर्जुन कपूरलाच होकार दिला असल्याचं बोललं गेलं.

आणखी वाचा : अखेर कोडं सुटलं! विवेक अग्निहोत्री उलगडणार करोना वॅक्सिन निर्मितीमागील गोष्ट; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

मात्र आता मलायकाने एक नवा फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णवीराम दिला आहे. मलायकाने नुकतंच तिच्या आगामी रिअॅलिटी शोचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या शोचं नाव आहे ‘मुव्हिंग विथ मलायका.’ ५ डिसेंबर पासून ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर हा रिअॅलिटी शो आपल्याला पाहता येणार आहे. या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून मलायकाची कधीही न दिसून आलेली बाजू प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. हा शो तिच्या जीवनावर आधारित आहे. या शोच्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातली अनेक गुपितं समोर येणार आहेत.

हेही वाचा : “…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं कारण

मलायकाने या रिअॅलिटी शोचं पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “मी ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ला ‘मुव्हिंग विथ मलायका’साठी होकार दिला.” तिच्या या कॅप्शनमुळे अर्जुन आणि मला एकाच्या लग्नाच्या सुरू झालेल्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. या शोसाठी मलायका खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु अर्जुन व मलायका लवकरच लग्न करणार आहेत असा समज झालेले मलायकाचे चाहत्यांची ती सध्या लग्न करत नसल्याने थोडीशी निराशा झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकजण तिला या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत. मलायकाला नव्या शोमध्ये बघण्यासाठी तिथे चाहते उत्सुक आहेत.