बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती कायमच सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. अनेकदा ती तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे प्रसिद्धीझोतात असते. यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. फॅशनबरोबरच तिला फिटनेससाठीही ओळखले जाते. सध्या ती तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिच्या या फोटोशूटच्या व्हिडीओवर अभिनेत्री करीना कपूरने कमेंट केली आहे. यावेळी करीनाने चक्क तिच्या खाण्याबद्दल कमेंट केली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मलायका अरोरा ही ४८ वर्षांची असली तरी ती तिच्या फिटनेससाठी कायमच चर्चेत असते. ती तिच्या फिटनेसची प्रचंड काळजी घेते. जीम, योगा याबरोबरच ती योग्य डाएट करण्याला सातत्याने प्राधान्य देते. नुकतंच मलायकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने निळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. हा व्हिडीओ रिल स्वरुपातील असून तिने या हटके कॅप्शनही दिले आहे. स्लो-मोशनमध्ये सर्व काही छान दिसते, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. यावेळी तिने ‘मानिके मांगे हिते’ या गाण्यावर रिल व्हिडीओ बनवला आहे.

आणखी वाचा : “माझ्या सासूबाई…” आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरचे स्पष्ट उत्तर

तिचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. नुकतंच तिच्या या रिल व्हिडीओवर करीना कपूरने कमेंट केली आहे. “तुम्ही जे बर्गर किंवा मिठाई खाल्लं आहे, ते तुम्हाला बघून कुठेही दिसत नाही”, अशी कमेंट करीना कपूरने केली आहे. तिच्या या कमेंटवर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

आणखी वाचा : मलायका अरोराला आहे ‘या’ गोष्टीची सवय, बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मलायका अरोरा ही सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.