Malaika Arora Father Anil Mehta Funeral : अभिनेत्री मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता यांचं बुधवारी ( ११ सप्टेंबर २०२४ ) निधन झालं. वांद्रे येथील राहत्या घराच्या इमारतीवरून उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. मात्र, सध्या या प्रकरणी पोलिसांचा आणखी तपास व चौकशी सुरू आहे. ही घटना घडली तेव्हा मलायका कामानिमित्त मुंबईबाहेर होती. वडिलांना शेवटचं पाहण्यासाठी आलेल्या मलायकाला अश्रू अनावर झाले होते. यावेळी लेक अरहान खान आपल्या आईला धीर देताना दिसला.

मलायकाचे वडील अनिल मेहता ६२ वर्षांचे होते. गुरुवारी मुंबईतील सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मलायकाचे इंडस्ट्रीमधील सगळे जवळचे मित्र तसेच खान कुटुंबीय तिला धीर देण्यासाठी आणि अनिल मेहतांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नुकतेच पोहोचले आहेत.

Anil Mehta made last calls to Daughters Malaika Arora
“मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
Malaika Arora father post mortem report
मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचे निधन कशामुळे झाले? शवविच्छेदन अहवालातून माहिती आली समोर
amitabh bachchan talked about rekha
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
Salman Khan
HIV पॉझिटिव्हची भूमिका साकारण्यासाठी संपूर्ण बॉलीवूडने दिलेला नकार; पण, सलमान खानने होकार देत घेतले होते ‘इतके’ मानधन
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Malaika Arora mother statement on ex husband anil arora death
चौकीदार मदतीसाठी ओरडत होता अन्…; मलायकाच्या आईने सांगितलं सकाळी काय घडलं? घटस्फोटानंतरही एकत्र राहायचे अनिल अरोरा-जॉयसी
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

हेही वाचा : “मी थकलोय…”, लेक मलायका अरोराला फोन करून आत्महत्येआधी काय म्हणाले होते अनिल मेहता? माहिती आली समोर

Malaika Arora Father Anil Mehta Funeral
Malaika Arora Father Anil Mehta Funeral ( फोटो सौजन्य : विरल भय्यानी )

अंत्यदर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटी पोहोचले

मलायकाच्या वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आज अरबाज खान, त्याची पत्नी शूरा, अर्जुन कपूर, फराह खान, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, जिनिलीया-रितेश, सोहेल खान, गौहर खान, गीता कपूर, मोहित मारवाह, टेरेंस, अर्शद वारसी, गुरू रंधावा, मिनी माथूर, पुनित मल्होत्रा, किम शर्मा असे सगळे सेलिब्रिटी मलायका व तिच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत.

हेही वाचा : Video : वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराला अर्जुन कपूरने दिला धीर, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

हेही वाचा : चौकीदार मदतीसाठी ओरडत होता अन्…; मलायकाच्या आईने सांगितलं सकाळी काय घडलं? घटस्फोटानंतरही एकत्र राहायचे अनिल अरोरा-जॉयसी

दरम्यान, मलायका ( Malaika Arora ) बुधवारी ( ११ सप्टेंबर ) सकाळी पुण्यात होती. मात्र, सावत्र वडिलांच्या निधनाची बातमी समजताच ती मुंबईच्या दिशेने निघाली. मलायका मुंबईत येण्यापूर्वी अनिल मेहतांच्या वांद्रे येथील घरी तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान पोहोचला होता. त्यानंतर काही वेळातच मलायका – अरबाज यांचा मुलगा अरहान, अरबाजचे वडील सलीम खान, सलमा खान, सोहेल खान, अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान या खान कुटुंबीयांसह सैफ अली खान व करीना कपूर मलायकाला धीर देण्यासाठी पोहोचले होते.