मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याच्या हटके पोस्टमधून तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘पोलीस लाइन’, ‘एक तारा’ या चित्रपटातून त्याने अभिनयाची छाप पाडली. गेल्याच महिन्यात त्याचा ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रदर्शित झालाहोता. नुकतीच त्याने आपल्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली आहे.

संतोष जुवेकराचा चाहतावर्ग मोठा आहे. आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. लवकरच तो आगामी ‘कुत्ते’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. “मित्रांनो १३ जानेवारीला एक अजून धमाका कुत्ते, खूप स्वप्न आहेत त्यातील एक अजून स्वप्न सत्यात उतरलं, पोस्टमध्ये पुढे त्याने चित्रपट कसा मिळाला याबद्दल खुलासा केला आहे.”

Photos : २०२२ मध्ये ‘हे’ बायोपिक प्रेक्षकांनी घेतले डोक्यावर; माधवन ते बिग बींसारख्या कलाकारांनी साकारली हटके भूमिका

‘कुत्ते’ हे या चित्रपटाचं नाव आहे. मध्यंतरी या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं आणि त्यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. ‘कुत्ते’या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज अशा प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. ‘कुत्ते’हा एक थ्रिलर असून, विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. आसमानचा हा पहिलाच चित्रपट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ या दिवशी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डार्क-कॉमेडी असून,चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे, तर गुलजार यांनी यातील गाणी लिहिली आहेत.