बॉलिवूडची एक लोकप्रिय जोडी म्हणजे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. शाहिद कपूरने २०१५ मध्ये त्याच्याहून १४ वर्ष लहान असलेल्या मीराशी लग्न केलं. आता आज हे जोडप्याला दोन दोन मुलीही आहेत. मीरा आणि शाहिद अनेक जाहिराती, मुलाखती आणि फॅशन शोमध्येही एकत्र दिसतात. तसेच ही दोघं त्यांच्यातलं बॉण्डिंग सोशल मीडियावरून जगाला दाखवत असतात. पण आता मीरा राजपूतने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहिदमधील ‘कबीर सिंग’ जागा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या वागण्याला मीराही त्रासली असल्याचे दिसत आहे.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने नुकताच एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मीरा तिच्या नवीन घरात बसून शांततेने ‘तुझे कितना चाहने लगे’ हे गाणं पियानोवर वाजवत आहे. अत्यंत सुमधुर आवाजात ती हे गाणं वाजवत असतानाच शाहिद अचानक तिच्या मागे येतो आणि असं काही करतो जे पाहून मीराला कबीर सिंगची आठवण होते.

आणखी वाचा : ‘भेडिया’चं हटके प्रमोशन, वरुण धवन-क्रिती सेनॉन यांनी मुंबईच्या रस्त्यावर केलं असं काही की ते पाहून सगळेच आवाक्

मीरा बऱ्याच दिवसांपासून पियानोचा सराव करत असून आज तिने सोशल मीडियावर ‘कबीर सिंग’ चित्रपटातील ‘तुझे कितने चाहने लगे’ या गाण्याचं कव्हर वाजवताना दिसली. ती पियानो वाजवत असतानाच जेव्हा शाहिद मागून आला आणि कबीर सिंग सारख्या आवाजात मीराशी बोलू लागला. इतकंच नव्हे तर त्याने तिला मागून येऊन घट्ट मिठीही मारली.

हा व्हिडीओ शेअर करताना मीराने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “खरा कबीर सिंह, तू कृपया शांत होशील का?” त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यांचे चाहते या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्यातलं बॉण्डिंग आणि मीराचं पियानो वादन आवडल्याचं सांगत आहेत.

हेही वाचा : आज कोटींच्या घरात फी आकारणाऱ्या बॉलिवूड स्टार्सना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘जर्सी’ चित्रपटात दिसला होता. हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूरची मुख्य भूमिका होती. आता शाहिद कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.