बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. अभिनेता रणबीर कपूरशी एप्रिल २०२२मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर काही महिन्यांतच तिने ही गूडन्यूज चाहत्यांना दिली. कपूर कुटुंबीय नव्या पाहुण्याची जय्यत तयारी करत आहेत. गरोदरपणात महिलांना डोहाळे लागतात. तसेच डोहाळे आलियालाही लागले आहेत. आलियाला पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली.
आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले होते. मोठी बहीण शाहीन भट्टसह आलियाने रविवारचा दिवस घालवला. यावेळी तिने शाहीनबरोबर चाट खाण्याचा आनंद घेतला. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. या फोटोला तिने ‘पावर ऑफ पुरी’ असं कॅप्शन दिलं होतं. दुसऱ्या स्टोरीमध्ये आलियाने शेवपुरीचा फोटो शेअर केला होता. या स्टोरीमध्ये तिने शाहीनलाही टॅग केलं होतं.
हेही वाचा >> Video : मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : …अन् चित्रपटातील किसिंग सीन शूट करताना रेखा यांना रडू कोसळलं, नेमकं काय घडलं होतं?
काही दिवसांपूर्वीच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही उपस्थित होते. आलिया-रणबीर त्यांच्या बाळासाठी आतुर आहेत. रणबीरने बाळासाठी काही वेळ ब्रेक घेणार असल्याचंही म्हटलं आहे. त्यांचे चाहतेही कपूर कुटुंबियांच्या घरी येणाऱ्या या नव्या पाहुण्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आलिया-रणबीर यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे.
हेही वाचा >> साजिद खानला ‘बिग बॉस’मधून काढून टाका, महिला आयोगाच्या अध्यक्षाची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. या निमित्ताने पहिल्यांदाच आलिया-रणबीर ऑन स्क्रिन एकत्र दिसले. बॉक्स ऑफिसवर अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अनेकदा आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली होती.