पापाराझी आणि जया बच्चन यांच्यात नेमके कसे संबंध आहेत हे आता जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. जया बच्चन यांना पापाराझी लोकांना पाहून प्रचंड संताप येतो. त्यांचे असे बरेच व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये त्या पापाराझींवर चिडलेल्या अन् त्यांना ओरडताना दिसत आहे. यामुळेच नेटकरी जया बच्चन यांच्यावर जबरदस्त टीका करतात. पण आता मात्र ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनीही जया बच्चन यांच्या या वर्तणूकीबद्दल भाष्य करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

एका इव्हेंटदरम्यान मौसमी चॅटर्जी या पापाराझींसमोर स्पॉट झाल्या अन् काही कारणास्तव त्या फोटोग्राफर्सवर थोड्या चिडल्या. यावर एकाने मौसमी यांची तुलना थेट जया बच्चन यांच्याशी केली. यावर मौसमी चॅटर्जी यांनी एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

आणखी वाचा : ‘मधुबाला’ हा बायोपिक लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्माते व प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून मोठी घोषणा

यावर पापाराझींना उत्तर देताना मौसमी चॅटर्जी म्हणाल्या, “मी जया बच्चनपेक्षा कित्येक पटीने चांगली आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही नसता तर आम्हाला कुणी विचारलं असतं?” एका इव्हेंटमध्ये मौसमी चॅटर्जी यांनी हजेरी लावली अन् त्यावेळी पापाराझींनी त्यांना वेगवेगळ्या पोझसाठी फोटो काढण्यासाठी विनंती केली. यामुळे मौसमी चांगल्याच वैतागल्या आणि त्यांनी थेट जया बच्चन यांच्याबद्दल भाष्य करत त्यांना टोमणा मारला.

View this post on Instagram

A post shared by Namaste Bollywood (@namastebollywood.in)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकेकाळी जया बच्चन आणि मौसमी चॅटर्जी एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी होत्या. एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला होता. या चित्रपटासाठी मौसमी यांनी तीन दिवस शूटिंग केले होते, पण जया बच्चन यांची सेक्रेटरी सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाच्या सेटवरच असल्याचे त्यांनी पाहिले. आणि मग अचानक एके दिवशी गुलजार यांनी चित्रपटात मौसमी चॅटर्जी यांची भूमिका जया बच्चन यांना देऊन त्यांना या चित्रपटातून काढले होते. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जया बच्चन या २०२३ च्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकल्या होत्या तर मौसमी या २०१३ पासूनच लाईमलाइटपासून दूर आहेत.