उत्तर प्रदेशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे ‘मुलायम सिंह यादव’. १० ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) संस्थापक म्हणून मुलायम सिंह यादव ओळखले जातात. याशिवाय त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे त्यांचे आणि बच्चन कुटुंबियांचे जवळचे संबंध होते. अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पक्षाशी संबंधित आहेत. मुलायम सिंह यादव हे बच्चन कुटुंबियांच्या विवाह सोहळ्यांना आणि समारंभांना नेहमी हजेरी लावत असत. याच मुलायम सिंह यादवांनी अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबेसेडर बनवले होते.

ही घटना २००७ सालातली आहे. मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अमिताभ बच्चन यांना यूपीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले. वास्तविक, त्यावेळी समाजवादी पक्षाचा मोठा चेहरा समजले जाणारे दिवंगत नेते अमर सिंह यांच्याशी अमिताभ बच्चन यांची खास मैत्री होती. दरम्यान, अमिताभ बच्चन यांची यूपीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान बिग बींनी पक्षाचा प्रचारही केला होता. मात्र याचा फायदा मुलायम सिंह यादव यांना झाला नाही, उलट नुकसान झाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार आवाजातून “यूपी में बहुत दम है, क्यूंकी जुर्मा यहाँ कम है” ला प्रमोट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, पण त्याचा परिणाम सकारात्मक होण्याऐवजी अगदी उलट झाला.

प्रसिद्ध होस्ट मनीष पॉलचे ओटीटी विश्वात पदार्पण! दिसणार एका हटके भूमिकेत

बच्चन घराण्याचे गांधी कुटुंबाशी संबंध होते. अमिताभ बच्चन मूळचे उत्तर प्रदेशचे, त्यांनी अलाहाबाद (प्रयागराज) इथून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना अपयश मिळाले होते. याउलट मुलायम सिंह यादव तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीही केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुलायम सिंह यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवत, राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली . अखिलेश यादव यांच्या खांद्यावर आता पक्षाची जबाबदारी आहे .