अभिनेता सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच त्याचा किसी का भाई किसी की जान चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानचे खूप मित्र आहेत. पण त्याचा एक जवळचा मित्र आहे, जो अभिनेता नाही.

थिएटरमध्ये सीटखाली सापडलेली चिमुरडी; उंदरांनी कुरतडलेलं शरीर, प्रकाश झा यांनी दत्तक घेतली होती लेक दिशा

सलमान खानच्या सर्वात जवळच्या मित्राचं नाव नदीम कुरेशी आहे. ते सलमानच्या टीव्ही प्रॉडक्शन कंपनी SK TV चा संस्थापक आणि मॅनेजिंग पार्टनर आहेत. जानेवारी सलमानने त्याच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली होती. तेव्हापासून नदीम यांची चर्चा आहे. टीव्ही निर्माता म्हणून त्यांचा पहिला शो ‘द कपिल शर्मा शो’ होता, या माध्यमातून कपिल शर्माने टेलिव्हिजनवर पुनरागमन केले होते. त्यावेळी सलमानने एसके टीव्हीचे संस्थापक आणि मॅनेजिंग पार्टनर नदीम कुरेशी यांच्या नावाची घोषणा केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खान लवकरच कतरिना कैफबरोबर ‘टायगर 3’ मध्ये अॅक्शन करताना दिसणार आहे. एवढंच नाही तर या चित्रपटात शाहरुख खानचाही खास कॅमिओ असणार आहे. याशिवाय सलमान ‘किसी का भाई किसी जान’मध्ये दिसणार आहे, यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे आणि शहनाज गिल देखील दिसणार आहेत.