७० च्या दशकात चित्रपटसृष्टीवर एका माणसाचं प्रचंड गारुड होतं ते म्हणजे अमिताभ बच्चन. आजही बिग बी यांची इंडस्ट्रीमध्ये चलती आहे पण ७० च्या दशकात बिग बी यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ने प्रेक्षकांवर चांगलंच गारुड केलं होतं. बिग बी यांची अशी प्रतिमा तयार करण्यात आणखी एका जोडगोळीचा हात होता तो म्हणजे लेखक सलीम-जावेद यांचा. सलीम-जावेद अन् बिग बी यांच्या या चित्रपटांबद्दल नुकतंच एका अभिनेत्याने एक वक्तव्य केलं आहे.

भारतीय टेलिव्हिजन सृष्टीत लोकप्रिय असलेल्या नकुल मेहताने अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल वक्तव्य केलं आहे. सलीम-जावेद यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या बच्चन यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ने लोकांच्या पुरुषत्वाबद्दलच्या व्याख्या बदलल्या असं नकुलने मत मांडलं आहे.

आणखी वाचा : शाहरुख दिसला प्रथमच सासूबाईंसह, शाहिद व हार्दिक पांड्याची धमाल; मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बॉलिवूड स्टार्सची हजेरी

‘बी अ मॅन यार’ या युट्यूबवरील कार्यक्रमात नकुल म्हणाला, “पॉप कल्चर व सलीम-जावेद यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहिलेल्या चित्रपटांमुळे पुरुष असण्याच्या व्याख्या बदलल्या. ७० च्या दशकात सलीम जावेद व बच्चन यांनी ‘मर्द को दर्द नहीं होता’ ही संकल्पना लोकांच्या मनात रुजवली, पण त्या काळात मात्र मी शशी कपूर यांचा चाहता झालो. बच्चन यांचं पात्र लोकप्रिय झालं ते केवळ शशी कपूर यांच्या पात्राची प्रतिष्ठा आणि मोठेपणामुळेच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशी कपूर यांच्या पात्रातील सगळे गुण आपल्याला आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीमध्ये पाहायला मिळतात असंही नकुल म्हणाला. नकुलने ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेच्या दुसऱ्या अन् तिसऱ्या सीझनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली अन् त्यामुळेच त्याला लोकप्रियता मिळाली.