scorecardresearch

Premium

नाना पाटेकरांनी सांगितलं राग येण्यामागचं कारण; म्हणाले, “तुमची पात्रता…”

विवेक अग्निहोत्रींच्या ‘त्या’ विधानाबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “एखादी गोष्ट मला…”

why nana patekar gets angry
नाना पाटेकर राग येण्याबद्दल काय म्हणाले? (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

नाना पाटेकर विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. ते चित्रपटात डॉ. बलराम भार्गव यांचे पात्र साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाची नाना पाटेकर यांना ऑफर देण्यापूर्वी आपण जरा घाबरलो होतो, असं विवेक अग्निहोत्री ट्रेलर लाँचच्या वेळी म्हणाले होते. याबाबत नाना पाटेकरांना विचारण्यात आलं. त्यांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.

‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर यांना स्वतःच्या भूमिकेत पाहून भावुक झाले डॉ. बलराम भार्गव, म्हणाले…

amruta khanvilkar
मराठी कार्यक्रमात कलाकारांची थट्टा करण्याबद्दल अमृता खानविलकरचा संताप, म्हणाली “तुम्ही मजेत…”
amruta khanvilkar himanushu malhotra
“आता आमच्यात प्रेम…” अमृता खानविलकरचे पती हिमांशूबरोबरच्या नात्याबद्दल थेट वक्तव्य, म्हणाली “ते रिलेशन…”
gashmeer mahajani replies to his fans questions
“स्वामींबद्दल काय सांगशील?”, चाहत्याच्या प्रश्नावर गश्मीर महाजनी म्हणाला, “त्यांच्या आशीर्वादाने…”
Gautami Patil
“तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…

नाना पाटेकर चिडतात, असं लोकांचं मत का झालंय, याबाबत बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “कोणी चुकीची गोष्ट बोललं किंवा काही चुकीचं लिहिलं असेल तर मी चिडतो. एक तर तुम्ही मला ती गोष्ट समजावून सांगा किंवा मी म्हणतोय ते समजून घ्या. या दोनपैकी काहीतरी एक करा, असं माझं म्हणणं असतं. तुम्ही मला नाही समजावू शकलात तर मी ते काम करण्यास नकार देईन. तुम्ही दिग्दर्शक आहात, एका कलाकाराला समजावून सांगण्याची तुमची पात्रता असायलाच पाहिजे.”

“मला पद्मश्री पुरस्कार का दिला?” नाना पाटेकरांचा प्रश्न; म्हणाले, “माझ्यासारख्या माणसाला…”

“काहीतरी लिहिलंय, ते तुम्ही समोरच्याला समजावून सांगू शकत नसाल तर नका लिहू. अशा वेळी कोणी तीच ती गोष्ट म्हटली की मी चिडतो. मला एखादी गोष्ट समजली नाहीये, तर ती समजावून सांगा. जी गोष्ट समजतच नाही ती लिहूच नका आणि बोलूही नका. कारण एखादी गोष्ट आपल्यालाच समजत नसेल तर ती साकारणार कशी, ती लोकांना कशी समजावून सांगणार. कारण ती गोष्ट समजावून सांगण्याचं माध्यम आम्ही आहोत, आमचा चेहरा आहे. म्हणजे ती आम्हीच प्रेक्षकांना समजावून सांगायची आहे. तर्कांवर आधारित चित्रपट असेल तर तसं आधीच सांगा,” असं नाना पाटेकर म्हणाले.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

दरम्यान, सध्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट करोना काळात लसीच्या निर्मितीवर आधारित आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर बनवण्यात आला आहे. चित्रपटात नाना पाटेकर डॉ. बलराम भार्गव यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, गिरीजा ओक आणि रायमा सेन हे कलाकारही चित्रपटात आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patekar reveals why he gets angry says dont write if you cant justify statement hrc

First published on: 26-09-2023 at 17:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×