ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांत नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. मध्यंतरी ते त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरूनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली.

आता नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून लोकांसमोर येणार आहेत. ‘मॅन वुमन मॅन वुमन’ ही त्यांची शॉर्टफिल्म नुकतीच प्रदर्शित झाली आहे. त्याविषयावर बोलतानाच नसीरुद्दिन सध्याचा मुख्य प्रवाहातील चित्रपट आणि त्यामुळे झालेलं प्रेक्षकांचं नुकसान यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘मैं हूं ना’ प्रदर्शित झाल्यावर फराह खानने मागितलेली सुश्मिता सेनची माफी; अभिनेत्रीने सांगितलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘IANS’शी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले, “आपल्या कमर्शियल चित्रपटांनी आपल्या प्रेक्षकांचं प्रचंड नुकसान केलं आहे. सत्यजित रे यांनीही त्यांच्या पुस्तकात ही गोष्ट मांडली आहे. त्यांचा उद्देश आपल्या चित्रपटांचा अपमान करणे नाही, त्यांनी त्यांच्या पुस्तकातून आपल्याकडे फिल्ममेकर्स आणि बाहेरच्या देशातील फिल्ममेकर्स यांची तुलना केली आहे.”

पुढे ते म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षं पूर्णं झाली तरी आजही आपण त्याच पठडीतील चित्रपट करत आहोत. मुख्य प्रवाहातील कित्येक चित्रपटांच्या कथेचे संदर्भ महाभारतासारख्या महाकाव्यात सापडतात. प्रत्येक चित्रपटात तुम्हाला रामायण किंवा महाभारत यांचा संदर्भ आढळतोच. इतकंच नव्हे शेक्सपियरचेही बरेच संदर्भ सध्याच्या बऱ्याच चित्रपटात तुम्हाला आढळतील.”