बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लाडकी नात व श्वेता बच्चन नंदाची लेक नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) सिनेसृष्टीत सक्रिय नाही. ती वडील निखिल नंदा यांच्या बिझनेसमध्ये मदत करते. आता नव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नव्याचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत आहेत. नव्या बॉलीवूड अभिनेत्याला डेट करत होती, पण आता या दोघांचंही नातं सपलंय, असं म्हटलं जात आहे.

Navya Naveli Nanda Siddhant Chaturvedi break up: नव्या नवेली नंदा ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत होती. दोघेही अनेकदा चित्रपट पाहायला व फिरायला सोबत जाताना दिसायचे, पण आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे, असं म्हटलं जात आहे. सिद्धांत नव्याची आई म्हणजेच श्वेता बच्चनच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीलाही आला होता.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचे नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीशी खूप दिवसांपासून जोडले जात होते. अनेकवेळा दोघेही एकत्र पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. दोघेही ऋषिकेशला सोबत फिरायला गेले होते व तिथून त्यांनी फोटो शेअर केले होते. एकदा ते एकाच कारने दिवाळी पार्टीत गेले होते. आता मात्र ते वेगळे झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ऑलिम्पिकमध्ये तुर्कीच्या नेमबाजाने जिंकलं रौप्य पदक, पण बॉलीवूड अभिनेत्याचं होतंय अभिनंदन; प्रतिक्रिया देत म्हणाला…

Navya Naveli Nanda Break Up With Siddhant Chaturvedi
सिद्धांत चतुर्वेदी व नव्या नवेली नंदा (फोटो – इन्स्टाग्राम)

‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, नव्या व सिद्धांत आता वेगळे झाले आहेत. पण त्यांचं नातं चांगलं होतं, त्यामुळे ब्रेकअपनंतरही ते मित्र राहतील. सोशल मीडियावरही या दोघांमध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळतं. कारण आधी दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या पोस्ट लाइक करायचे. तसेच हार्ट इमोजी कमेंट करायचे, पण आता मात्र ते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत नाहीत.

क्रांती रेडकरच्या आईने चार्जर पाठवण्यासाठी लढवली शक्कल, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “समीर वानखेडे यांच्या सासूबाई…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धांत चतुर्वेदीबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘को गए हम कहां’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये अनन्या पांडे व आदर्श गौरव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. याशिवाय त्याने कतरिना कैफ व रणवीर सिंहबरोबर चित्रपट केले होते. तो दीपिका पदुकोण व अनन्या पांडेबरोबर ‘गेहराइयां’ चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.