scorecardresearch

आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Video: नवाजुद्दीन सिद्दीकीची सख्या भावानेकडूनच हकालपट्टी; आजारी आईला भेटायला आलेल्या अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

nawazuddin siddiqui video viral
नवाजुद्दीन सिद्दीकीचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलियाने नवाज व त्याच्या कुटुंबियांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय नवाजुद्दीन बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्याच्या पत्नीने केला आहे.

काही दिवसांपूर्वीच नवाजचा भाऊ शमासनेही त्याच्यावर आरोप केले होते. आता त्याच्या दुसऱ्या भावाकडून नवाजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आजारी असलेल्या आईला बघण्यासाठी नवाजुद्दीन भाऊ राहत असलेल्या वर्सोवा येथील बंगल्यावर गेला होता. परंतु, भाऊ फैजुद्दीनने घरात घेतलं नाही. बंगल्याच्या गेटवरुनच नवाजला त्याने परत पाठवलं. त्यामुळे आजारी आईला बघायला आलेल्या नवाजला तिची भेटही घेता आलेली नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> राखी सावंतच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार! कोण साकारणार मुख्य भूमिका? चित्रपटाचं नाव आहे…

आजारी असलेल्या आईची भेट घेण्यासाठी आलेल्या नवाजुद्दीनला त्याच्या सख्या भावाने घरात पाऊलही ठेवून दिलं नाही. “आईची प्रकृती बरी नाही. तिला कोणालाही भेटायची इच्छा नाही. त्यामुळे तू तिला भेटू शकत नाहीस”, असं फैजुद्दीन नवाजला म्हणाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन शुक्रवारी(३ मार्च) डेहरादूनहून परतणार होता. परंतु, आईच्या प्रकृतीबाबत कळताच त्याने लगेचच मुंबई गाठली. परंतु, त्याला आईला भेटता आले नाही.

हेही वाचा>> हृदयविकाराचा झटका येण्याआधी सुश्मिता सेनला झालेला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाली “आठ तासांनी मला…”

नवाजुद्दीनचे पत्नीबरोबरच त्याच्या कुटुंबियांबरोबरही वाद आहेत. शमास व फैजुद्दीन या दोन्ही भावांबरोबर नवाजचे काही ना काही कारणामुळे खटके उडालेले आहेत. नवाजुद्दीन पैसा व प्रसिद्धीचा गैरवापर करत असल्याचं त्याचा भाऊ शमासने मुलाखतीत म्हटलं होतं. मनोरंजन विश्वातही नवाजचे अनेक सेलिब्रिटींबरोबर वाद झालेले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 12:30 IST