अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं आहे. गेले काही दिवस तो पत्नी व भावाबरोबरच्या वादामुळे चर्चेत आहे. त्याच्या भाऊ शमास आलियाची बाजू घेत सातत्याने अभिनेत्यावर टीका करत आहे. त्याच्याविरोधात वक्तव्ये करत आहे. अशातच पुन्हा एकदा शमासने एक कॉल रेकॉर्डिंग शेअर करत नवाजुद्दीनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

“तू अमानुष आहेस” नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलांचा रस्त्यावरील व्हिडीओ पाहून संतापला अभिनेता; म्हणाला, “जर तुझी मुलं…”

शमास सिद्दीकीने त्याच्या ट्विटर हँडलवर फोन कॉलचे रेकॉर्डिंग शेअर केले आहे. “मला हा व्हिडीओ होळीची भेट म्हणून मिळाला आहे. नवाजुद्दीनचा दिनक्रम असा आहे की तो रोज आपल्या स्टाफला मारहाण करतो. नवाजुद्दीनने दुसऱ्यांदा त्या मुलाला मारहाण केल्याचं त्याचा मॅनेजर सांगत आहे. त्या मुलाला विमानतळ आणि ऑफिसमध्येही मारलं होतं. आता त्याचा व्हिडीओ लवकरच येणार आहे,” असं कॅप्शन देत शमास सिद्दीकीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पत्नीशी वादांमुळे चर्चेत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘या’ अभिनेत्रींबरोबर होते अफेअर; महिला वेटरसह वन नाइट स्टँड, आत्महत्येचा विचार अन्…

कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोन लोक बोलताना ऐकू येत आहेत. ते म्हणतात, “अरे, एक गोष्ट सांग, अवधेशने मला सांगितलं की नवाज भाईने आज पुन्हा मोनूला मारलं? ‘हो सर’. कधी मारलं? ‘शूटच्या दिवशी सकाळी सकाळी, दोनदा मारलं.’ किती दिवस झाले या गोष्टीला? ‘ही तर आताची गोष्ट आहे’. तू सांगितलं होतं, त्यानंतरची गोष्ट आहे का? ‘होय सर, ती खूप आधीची गोष्ट आहे सर. ही अलीकडची गोष्ट आहे’. चल, मी त्याच्याशी आरामात बोलेन. हे अत्यंत चुकीचं आहे. मी माझ्या रितीने त्याच्याशी बोलेन,” असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतोय. शमास व मॅनेजरमधील हा संवाद असल्याचा दावा स्वतः शमास यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पत्नी आलियाने केलेल्या सर्व आरोपांवर दोन दिवसांपूर्वी स्टेटमेंट प्रसिद्ध करत नवाजुद्दीनने त्याची बाजी मांडली होती. आपला घटस्फोट झाला असून पैशांसाठी आलिया आपली प्रतिमाहनन करत असल्याचा दावा नवाजुद्दीनने केला होता.