अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार चर्चा करत नाही. तसेच त्याचे कुटुंबही फारसे प्रकाशझोतात नसते. नवाजुद्दीनने २००९मध्ये आलिया सिद्दीकीशी लग्न केले होते. त्यांना दोन अपत्ये आहेत. मुलीचं नाव शोरा सिद्दीकी असून मुलाचं नाव यानी सिद्दीकी आहे. नवाजुद्दीनच्या लेकीचा अलीकडेच वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याने मुलीची एक रील इंस्टाग्रामला शेअर केली होती. दरम्यान, त्यानंतर पहिल्यांदाच तो रविवारी लेकीबरोबर मुंबई विमानतळावर दिसला.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो मुलीबरोबर चाहताना दिसतोय. बाप-लेकीचा हा व्हिडीओ पापाराझींनी इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओवर चाहते लाइक्स आणि शेअर्स करत आहेत. चाहत्यांनी पहिल्यांदाच नवाजुद्दीन सिद्दीकीसह मुलगी शोरा यांना एकत्र पाहिलंय. यामध्ये नवाजने कॅज्युअल ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक पँट घातली आहे, तर त्याची मुलगी शोराने डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्स परिधान केली होती. दरम्यान, युजर्स खूप छान, ‘खूप क्यूट’ अशा कमेंट्स व्हिडीओवर करत आहेत.

शनिवारी १० डिसेंबरला शनिवारी अभिनेत्याने एक रील शेअर केली होती. त्यामध्ये शोरा सिद्दीकीचे तिच्या बालपणापासून आतापर्यंतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ होते.”वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय लव्ह #शोरासिद्दीकी” असं कॅप्शन त्याने दिलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीचा पुढचा चित्रपट ‘हड्डी’ २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने फ्लॉप चित्रपटांबद्दलही मत व्यक्त केलं होतं. तेव्हा चित्रपटाचे मोठे बजट त्याच्या फ्लॉपला कारणीभूत असतात, असं तो म्हणाला होता.