गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे चर्चेत आहे. याबरोबरच नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटांसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते. त्यापैकीच त्याचा ‘जोगीरा सारा रा रा’ हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे, पण अपेक्षेप्रमाणे नवाजुद्दीन सिद्दिकी असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही.

२६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तरीही पाच दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारच निराशाजनक आहेत. समीक्षकांनी जरी या चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी जनता जनार्दनने याकडे पाठ फिरवली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बघितलं तर याने पहिल्या दिवशी केवळ ५० लाखांचा व्यवसाय केला.

आणखी वाचा : ४९ की ५७…मलायका अरोराचं नेमकं वय काय? जाणून घ्या

पाचव्या दिवसानंतर याच्या कमाईत सतत घट होतानाच दिसत आहे. मीडिया रीपोर्टनुसार पाचव्या दिवशी या चित्रपटाने केवळ ३२ लाखांची कमाई केली आहे. या पाच दिवसात चित्रपटाला जेमतेम १.८३ कोटी कमावता आले आहेत. हा चित्रपट कोविड आणि लॉकडाउनमुळे बराच काळ रखडल्याने हा विषय लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागला असं काही लोकांचं म्हणणं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी याने एका वेडिंग इव्हेंट प्लॅनिंग कंपनीच्या मालकाची भूमिका निभावली आहे. याच दरम्यान त्याच्या आयुष्यात नेहा शर्माचं पात्र येतं आणि पुढे ही प्रेमकहाणी आपल्यासमोर उलगडते. नवाजुद्दीन सिद्दिकीसारखा मोठा स्टार असूनही प्रेक्षकांनी चित्रपटाला नाकारलं असल्याचं त्याच्या बॉक्स ऑफिसवरील आकड्यांवरुन स्पष्ट होत आहे.