‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली होती. शनिवारी ‘बिग बॉस ओटीटी सीझन-२ ला सुरुवात झाली ‘बिग बॉस ओटीटी सीझन-२’ यंदा सलमान खान होस्ट करत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या बिग बॉस ओटीटी सीझनमध्ये नवाजूद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाही स्पर्धेक म्हणून सहभागी झाली आहे. मात्र, तिच्या या निर्णयावर नवाजची काय प्रतिक्रिया होती याबाबतचा खुलासा आलियाने केला आहे.

हेही वाचा- सनी देओलचा लेक करणचा शाही विवाहसोहळा संपन्न; लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बिग बॉस ओटीटीच्या ओपनिंगदरम्यान भाईजानने आलियाला नवाझुद्दीनच्या प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा आलिया म्हणाली, “नवाजने या निर्णयात मला साथ दिली. तसेच जोपर्यंत मी बिगबॉसमध्ये आहे तोपर्यंत आमच्या मुलांची काळजी तो घेणार आहे. त्याने मला फक्त ‘बिग बॉस ओटीटी २’ वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. मी काहीच नाही फक्त नवाजुद्दीन सिदीक्कीची बायको आहे”, असंही आलिया म्हणाली.

हेही वाचा- ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कंगना रणौतला आली इरफान खानची आठवण, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर असलेल्या मतभेदांचा खुलासा केला होता. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करून आपल्या घरातील परिस्थितीबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर आलिया तिच्या नव्या आयुष्यात आलेल्या मिस्ट्री मॅनमुळेही चर्चेत आली होती. आता आलिया बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाली आहे.