अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीने बॉलीवूड स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या नवाजुद्दिन त्याच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नवाजुद्दिनने या चित्रपट अभिनेत्री अवनीत कौरबरोबर स्क्रिन शेअर केली आहे.

हेही वाचा : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कोकणात जाऊन घडवतेय मडकी, ‘तो’ फोटो शेअर करीत म्हणाली “कळलंय आयुष्य मला…”

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीने ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ च्या सेटवरील काही किस्से सांगितले आहेत. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’ दिग्दर्शक अनुराग कश्यप, नवाजुद्दिनला सेटवर खूप ओरडले होते याबद्दल सांगताना अभिनेता म्हणाला, “मला तेव्हा हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते रॉबर्ट डी नीरो आणि अल अल पचिनो खूप आवडायचे. मी त्यांच्यासारखा वागू लागलो होतो. ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’च्या सेटवर मी पहिल्याच दिवशी अल पचिनोंसारखा वागत होतो. माझे असे वर्तन पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यप खूप भडकले.”

हेही वाचा : अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायकाच्या डान्सची चर्चा; ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले “तुझा मुलगा…”

नवाजुद्दिन पुढे म्हणाला, “अनुराग यांनी मला सांगितले, ‘तू खूप अल पचिनोंसारखा खूप वागत आहेस, जे अत्यंत चुकीचे आहे.’ त्यांचा ओरडा ऐकल्यावर मी रात्रभर झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पूर्णपणे नवाजुद्दिन सिद्दिकी म्हणून त्यांच्यासमोर गेलो.”

हेही वाचा : “मरेपर्यंत संघर्ष आहेच” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे स्पष्ट मत; म्हणाला, “खिशात पैसे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवाजुद्दिनचा ‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपट अलीकडेच २३ जूनला ओटीटीवर रिलीज झाला आहे, तर अभिनेत्याचा बहुचर्चित‘हड्डी’ चित्रपट या वर्षाखेरीस रिलीज होणार आहे.