अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या ‘हड्डी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. तो लूक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. पण आता त्याने केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सोशल मीडियावर सक्रिय राहून नवाजुद्दीन त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. त्याचप्रमाणे विविध मुद्द्यांवर तो अगदी खुलेपणाने भाष्य करताना दिसतो. आता त्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो ‘हड्डी’ या त्याच्या आगामी चित्रपटातील आहे. या फोटोतून त्याचा एक वेगळा अंदाज समोर आला आहे. मात्र या फोटोची कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : Video: वादात अडकलेल्या ‘बेशरम रंग’ गाण्याचं कौतुक करणाऱ्याला दीपिका पदुकोणने दिलं ‘हे’ उत्तर, व्हिडीओने वेधलं लक्ष

नवाजुद्दीनने त्याचा स्त्री वेशातील एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याने लाल साडी नेसली असून लांब कानातले, मोठा नेकलेस घातला आहे. तसंच कपाळावर लाल रंगाची टिकली, ओठांना डार्क गुलाबी रंगाचं लिपस्टिक त्याने लावलं आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिलं, “गिरफ़्तार तेरी आँखो में हुवे जा रहे हैं हम, जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं हम.”

हेही वाचा : “सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. उत्त तो स्त्री आणि तृतीयपंथी अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. जवळपास ४ वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.