scorecardresearch

“सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव

त्याने शाहरुख खानबरोबर ‘रईस’ चित्रपटात तर सलमान खानबरोबर त्याने ‘किक’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केला आहे.

“सलमान आणि शाहरुख दोघेही…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला अभिनेत्यांबरोबर काम करण्याचा अनुभव

नवाजुद्दीन सिद्दीकी याचे नाव बॉलिवूडमधील बहुआयामी कलाकारांच्या यादीत घेतले जाते. त्याने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपट केले. तसंच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आजच्या घडीला त्याचे जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. या त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याला अनेक सुपरस्टार्सबरोबर काम करायला मिळलं. हा त्याचा अनुभव त्याने सर्वांशी शेअर केला आहे.

त्याने नुकतीच ‘ई टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला. त्याने शाहरुख खानबरोबर ‘रईस’ चित्रपटात काम केलं आहे. तर सलमान खानबरोबर त्याने ‘किक’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात स्क्रीन शेअर केला आहे. आता अनेक वर्षांनी नवाजुद्दीनने या दोघांच्या कामाच्या पद्धतीबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : तेजस्वी प्रकाशने घेतला ब्रेकअप करायचा निर्णय, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

किंग खानबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगताना नवाजुद्दीन म्हणला, “शाहरुख खानबरोबर काम करताना अनेकदा रीहर्सल करण्याची संधी मिळते. जर एखादा सीन चांगला झालेला नाही असं टीमपैकी कोणालाही वाटलं की तर तो सीन पुन्हा नव्याने शूट केला जातो.”

हेही वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नाकारली होती ‘सेक्रेड गेम्स’ची ऑफर, पण…

तर दुसरीकडे सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करताना नवाजुद्दीने सांगितलं, “सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. तो एक अभिनेता म्हणून खूपच चांगला आहे. जार् त्याला त्याचा एखादा संवाद चांगला वाटला तर तो संवाद सलमान सहकलाकाराला देतो. तो कॅमेऱ्यासमोर सहज सांगतो, “हा डायलॉग तू बोल.” शाहरुख आणि सलमान या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता असं त्याने आवर्जून सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 17:33 IST

संबंधित बातम्या