बॉलीवूड अभिनेता वरुण धवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वरुणने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालशी जानेवारी २०२१ मध्ये लग्न केले. आज वरुण आणि नताशा बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ते अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. तर आता वरुण आणि नताशा लवकरच आई-बाबा होणार अशा चर्चा रंगल्या.
वरुण आणि नताशा नेहमीच त्यांचं वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवतात. तर वरुणची पत्नी नताशा फार क्वचित मीडियासमोर येते. पण आता त्यांचे काही शेअर आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून ते लवकरच आई-बाबा होणार असा अंदाज नेटकरी लावत आहेत. पण आता यावर वरुण-नताशाच्या जवळच्या व्यक्तीने प्रतिक्रिया देत खरं काय ते सांगितलं आहे.
वरुण आणि नताशाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला. या व्हिडिओमध्ये ते मुंबईतील एका फर्टिलिटी क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे नताशा आई बनणार आहे का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच यावर त्यांच्या चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत ती दोघं आई-बाबा होणार असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली. पण ती दोघं फर्टिलिटी क्लिनिकमध्ये नाही तर डर्मेटोलॉजिस्टकडे गेले होते. ती दोघं आई-बाबा होणार ही गोष्ट खोटी असून या सर्व अफवा आहेत, असं त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ‘ई टाइम्स’ला सांगितलं.
वरुण आणि नताशा आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील दोन वेळा नताशा गुड न्यूज देणार अशा चर्चा रंगल्या होत्या. तर एकदा नताशाने स्पष्टपणे या सर्व अफवा असल्याचंही सांगितलं होतं.