बॉलिवूड स्टार्स नेहमीच त्यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. पण त्यांच्याप्रमाणेच त्यांची मुलंही नेहमीच चर्चेचा विषय बनतात. शाहरुख खानची लेक सुहाना ही त्यातलीच एक स्टारकिड आहे. सध्या ती तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत असलेली सुहाना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे. सुहाना नुकतीच जगप्रसिद्ध ब्रँडची ॲम्बेसिडर झाली. एकीकडे त्यावरून तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे काहींनी तिला ट्रोल केलं आहे.

सुहाना खान ही न्यूयॉर्कमधील ब्युटी ब्रँड ‘मेबलिन’ची ब्रँड ॲम्बेसिडर बनली आहे. सोमवारी मुंबईत आयोजित एका मीडिया इव्हेंटमध्ये सुहाना या ब्रँडची ॲम्बेसिडर होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. यावेळी तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या. पण तिने या कार्यक्रमात दिलेल्या भाषणाने ती ट्रोल होऊ लागली आहे.

आणखी वाचा : Video: शाहरुख खानच्या लेकीला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का, म्हणाले, “सुहाना तर…”

हा ग्रँड इव्हेंट संपन्न होताच या कार्यक्रमातील तिचे अनेक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. तर एका व्हिडीओत ती तिचा आनंद व्यक्त करताना दिसली. “‘मेबलिन न्यू यॉर्क’ने त्यांचा चेहरा म्हणून माझी निवड केली याबद्दल मी त्यांची खूप मनापासून आभारी आहे,” अशा शब्दात तिने तिचा आनंद व्यक्त केला. पण यावरून काही नेटकरी तिच्यावर टीका करू लागले आहेत.

हेही वाचा : Video: “ही कोण…” सुहाना खानला मागे टाकत तिच्याबरोबरच्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहीलं, “मी लगेच शोधू लागलो की हिचं कर्तुत्त्व काय की हिला थेट जगप्रसिद्ध ब्रँडने ॲम्बेसिडर केलं.” तर दुसरा म्हणाला, “हिचं इतकंच नशीब चांगलं आहे की ही शाहरुख खानची मुकगी आहे.” तर काहींनी तिची तुलना इतर स्टारकिड्सशीही केली. एक जण म्हणाला, “सुहाना एकच गोष्ट अनेकदा बोलली. जसं न्यासा एकदा तिच्या भाषणात म्हणाली होती की, मुझे पढना बहुत पसंद हैं.” तर आणखी एक म्हणाला, “मला दोन सेकंद वाटलं की माझा ऑडिओ अडकला आहे. कारण ती पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत होती.”