बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं हा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यापैकीच एक म्हणजे वेदांत माधवन. आर माधवनचा मुलगा वेदांत हा सिनेसृष्टीपासून दूर राहून स्विमिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावत आहे. अशातच आता त्याचा एक वेगळा अंदाज सर्वांना पाहायला मिळाला आहे.

वेदांत त्याच्या करिअरसाठी भारताबाहेर स्थायिक झाला आहे. तो सध्या त्याच्या आईबरोबर दुबईमध्ये रहात आहे. दुबईमध्ये भारतापेक्षा मोठे तरणतलाव आहेत आणि तिथे सराव केल्याने वेदांत आणखी चांगली कामगिरी करू शकतो असं आर माधवन आणि त्याच्या पत्नीला वाटल्याने त्यांनी दुबईतमध्ये रहायला जाण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. आता वेदांत दुबईमध्ये पोर्शे गाडी चालवायला शिकताना दिसत आहे.

Prithviraj Chavan, pm modi,
“..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…

आणखी वाचा : स्वतःच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला आणि आर माधवन झाला कोल्हापूरचा जावई, जाणून घ्या अभिनेत्याची फिल्मी लव्हस्टोरी

वेदांत माधवनचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. यामध्ये तो गाडी चालवायला शिकत आहे. गलादरी मोटर ड्रायव्हिंग सेंटर, दुबईच्या सर्वोत्तम ड्रायव्हिंग स्कूलने वेदांतचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये वेदांत त्याच्या प्रशिक्षकासोबत पोर्शेमध्ये बसलेला दिसत आहे. मात्र, वेदांत थेट पोर्शेमधून ड्रायव्हिंग कसं काय शिकतोय हे अनेकांच्या पचनी पडत नाही.

हेही वाचा : R Madhavan birthday: आर. माधवनचं पूर्ण नाव माहीत आहे का? घ्या जाणून…

हा व्हिडीओ पाहून आणि त्यात वेदांत चालवत असलेली पोर्शे कार पाहून नेटकरी आता गोंधळात पडले आहेत आणि त्यांच्या कमेंटमध्येही तेच दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एकाने लिहिलं, “मी तर मारुती ८०० गाडी चालवायला शिकलो.” तर दुसऱ्याने लिहिलं, “दुबईमध्ये हे सामान्य आहे.” त्यामुळे वेदांतचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.