अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता, त्यानंतर आता निर्माते त्याचा सिक्वेल घेऊन आले आहेत. या चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर अक्षयने एक व्हिडीओही शेअर करत प्रदर्शनाची तारीख सांगितली.

नेटकऱ्यांना कसा वाटला Jawan चा Prevue? युजर्स ट्वीट करत म्हणाले, “शाहरुख खानचा चित्रपट…”

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी लक्ष वेधून घेतलं आहे. आशा आहे की हा चित्रपट हिंदू धर्माचा अनादर करणार नाही, अशा प्रकारच्या कमेंट्स यावर नेटकरी करत आहेत. अक्षयच्या लूकवर कमेंट न करता नेटकऱ्यांनी त्याला हिंदू धर्माचा अनादर न करण्यास सांगितलं आहे.

अक्षय कुमार सर्वच चित्रपटांमध्ये सारखेच एक्सप्रेशन देतो, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

akshay kumar
अक्षय कुमारच्या पोस्टवरील कमेंट्स

बॉलिवूड कलाकार कायम हिंदू देवतांचा अपमान करतात, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

akshay kumar
अक्षय कुमारच्या पोस्टवरील कमेंट्स

या चित्रपटात अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याचं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे.