बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि फोटोग्राफर यांच्यात कायमच खटके उडत असतात. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा एक एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी फोटोग्राफरना खडे बोल सुनावले होते. त्यापाठोपाठ अभिनेत्री तापसी पन्नूनेही फोटोग्राफर्सशी वाद घातला होता. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी तिला जया बच्चनचे नाव घेऊन ट्रोल केलं. त्यानंतर आता अभिनेत्री काजोलनेही तेच केले आहे. फोटोग्राफर यांच्याबरोबर तिचे सध्या वाद होताना दिसत आहे.

काजोल ही नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असते. तिच्या दिलखुलास स्वभावाने आणि उत्स्फूर्तपणाने ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. अनेक ठिकाणी पापराझींना ती फोटींसाठी पोज देत असते. पण यावेळी तिने पापराझींशी फोटो काढण्यावरून वाद घातला.

हेही वाचा : डान्ससाठी काहीपण! ‘झलक दिखला जा’साठी रुबिना दिलैकने परिधान केला ‘इतक्या’ किलोचा घागरा

काजोल आणि तिचा मुलगा नुकतेच विमानतळावर दिसले. दोघेही घाईघाईने गेटच्या दिशेने जात होते. त्यावेळी पापराझींनी तिला फोटो काढू देण्याची विनंती केली. पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. ती रागावलेलीही दिसली. कॅमेर्‍यासमोर पोज देण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती पापराझींच्या एका फोटोच्या मागणीकडे लक्ष न देता चालत होती. काजोलच्या अशा उद्धट वागण्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. एक नेटकरी म्हणाला, “बॉलिवूड स्टार्स अनेकदा त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी पापराझींना फोन करतात आणि नंतर त्यांच्याशीच उद्धटपणे वागतात.” या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला ‘जया बच्चनची दुसरी आवृत्ती’ म्हटलं आहे. दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहीलं, ”हिच्याबाबतीत असं काही घडलंच नाही तर हिला‌ काय झालं की ही जया बच्चनसारखी वागू लागली?” 

आणखी वाचा : बॉलिवूडकरांची दिवाळी पार्टी दणक्यात; पण चर्चा मात्र माधुरी आणि काजोलच्या डान्सचीच…, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल लवकरच ‘सलाम वेंकी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या करण जोहरच्या चित्रपटात ती शाहरुख खानसह कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे. येत्या वर्षात काजोल वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. याआधी ‘त्रिभंगा’ चित्रपटातून तिने ओटीटीवर पदार्पण केलं होतं.