Deepika Padukone at Diljit Dosanjh Concert : लोकप्रिय गायक पंजाबी गायक व बॉलीवूड अभिनेता दिलजीत दोसांझ भारतातील अनेक शहरांमध्ये परफॉर्म करतोय. सध्या त्याच्या ‘DIL-LUMINATI TOUR 24 ‘ची चांगलीच चर्चा आहे. शुक्रवारी (६ डिसेंबरला) दिलजीतच्या गाण्यांवर बंगळुरूकर थिरकले. त्याच्या या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना एक सरप्राईज मिळालं.

दिलजीत दोसांझच्या बंगळुरूतील कॉन्सर्टमध्ये ‘दुआ’ची आई म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणनने हजेरी लावली. दीपिका सध्या माहेरी आहे आणि आई झाल्यानंतर पहिल्यांदाच ती सार्वजनिक ठिकाणी दिसली. दीपिका बॅकस्टेजला असताना दिलजीतने आधी दीपिकाच्या ब्रँडच्या एका प्रॉडक्टबद्दल माहिती दिली. त्यानंतर त्याने ‘तुमच्या शहराची शान’ म्हणत दीपिकाला स्टेजवर बोलावलं आणि उपस्थितांना सरप्राईज दिलं.

हेही वाचा – Pushpa 2 Collection: पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी कमाईत घट, ‘पुष्पा 2’ चे एकूण कलेक्शन किती? वाचा

दीपिका मंचावर आल्यावर दिलजीतने ‘तेरा लव्हर’ हे गाणं गायलं. दीपिकाही या गाण्यावर मंचावर थिरकली. आई झाल्यानंतर दीपिका पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसल्याने चाहतेही खुश झाले. दीपिकाने सर्वांना नमस्कार म्हणत त्यांच्याशी संवाद साधला. दिलजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – प्रेमामुळे करिअर संपलं, देशही सोडावा लागला; २५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी म्हणाली, “मी लग्न केलंच नाही”

“दीपिका पादुकोणने खूप चांगलं काम केलं आहे. आपण तिला मोठ्या पडद्यावर पाहिलं आहे. स्वबळावर तिने बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. तुम्हा सर्वांना तिचा अभिमान असायला हवा. खूप खूप प्रेम,” असं दिलजीत दीपिकाबद्दल म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग लग्नानंतर सहा वर्षांनी आई-बाबा झाले. दीपिकाने तीन महिन्यांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रणवीर व दीपिका यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव दुआ पादुकोण सिंह असं ठेवलं आहे. दुआच्या जन्मानंतर पहिल्यांदाच दीपिका दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. सध्या तिचे कॉन्सर्टमधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले आहेत.