scorecardresearch

Premium

सलमान खानशी खोटं बोलला ओरी, ‘त्या’ विधानावरून घेतली माघार; म्हणाला, “मुंबईमध्ये एखाद्या श्वानासारखं…”

भर मंचावरून सलमान खानशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून ओरीची माघार, आपण खोटं बोलल्याचा त्यानेच केला खुलासा

Orry reavels he lied to salman khan
ओरी सलमान खानशी कशाबद्दल खोटं बोलला? जाणून घ्या

बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड आणि मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेला ओरी नुकताच ‘बिग बॉस १७’ मध्ये गेला होता. तो दोन दिवस पाहुणा म्हणून या शोमध्ये राहिला. ओरीचे पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी आहे. ओरीने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी सलमान खानशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्याच्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं होतं. पण आता ओरीने त्या विधानावरून यु-टर्न घेत आपण खोटं बोललो होतो, असा खुलासा केला आहे.

“ओरी काय काम करतो?” याबद्दल चाहत्यांना बरेच प्रश्न होते. सारा अली खान अनन्या पांडे यांनाही ओरीच्या कामाबद्दल माहिती नव्हती. बिग बॉसच्या मंचावर जेव्हा सलमान खानने ओरीला याबाबत विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं होतं. “मला इव्हेंट्समध्ये फोटोंसाठी पोज देण्याचे आणि पोस्ट करण्याचे पैसे मिळतात. मी एका रात्रीत या फोटोंमधून सुमारे २०-३० लाख रुपये कमावतो,” असं ओरी सलमानला म्हणाला होता. पण सत्य मात्र वेगळंच आहे, त्यानेच याबाबत माहिती दिली आहे.

Fraud online booking tadoba
ताडोबात ऑनलाईन बुकिंगच्या नावाने फसवणूक, एक अटकेत; दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
kerala mercy killing news
दोन मुलांना दुर्मिळ आजार, संपूर्ण कुटुंबाच्या इच्छामरणासाठी केरळमधील दाम्पत्य सर्वोच्च न्यायालयात जाणार; म्हणाले…
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
Knife attack on young woman on road in Nalasopara
नालासोपार्‍यात भर रस्त्यात तरूणीवर चाकू हल्ला; प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाचे कृत्य

एका रात्रीत ‘या’ कामातून २० ते ३० लाख रुपये कमावतो ओरी; खुलासा करत म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर…”

‘आयएएनसा’ला दिलेल्या मुलाखतीत ओरीने सेल्फी पोस्ट करण्यासाठी मिळणाऱ्या पैशांबद्दल सांगितलं. तो म्हणाला, “मला माझं विधान खूप आवडलं. पण मी जरा अतिशयोक्ती केली. माझ्या एका वक्तव्याने ज्या प्रकारे हेडलाईन बनायला सुरुवात झाली ते पाहून मला खूप आनंद झाला. खरं तर, जर मी सेल्फी पोस्ट करून इतके पैसे कमावले असते, तर मी आज एका बेटावर राहत असतो. इथे राहून कष्ट करत नसतो.”

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

“मी सेल्फी पोस्ट करून इतके पैसे कमवत असतो तर खूप चांगलं झालं असतं. कारण पैसा असता तर मी एका बेटावर बोटीवर राहत असतो. मुंबईमध्ये एखाद्या श्वानासारखं काम करत नसतो. मी आता जसं जगतोय त्यापेक्षा कैकपटीने चांगलं आयुष्य जगत असतो. मला एका पोस्टसाठी २० ते ३० लाख रुपये मिळाले तर मी स्वतःला नशीबवान समजेन,” असं ओरीने या मुलाखतीत म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orry reveals he lied to salman khan about getting paid 20 30 lakh for post hrc

First published on: 29-11-2023 at 17:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×